
म्हसळा श्रीवर्धन तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत... पोलीस विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष... श्रीवर्धन व म्हसळा तालुक्या मध्ये चालू आसलेल्या जुगार अड्ड्या विरोधात पोलिस अधीक्षक कार्यालय समोर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष हिरवे साहेब उपोषणाला बसणार..!
म्हसळा प्रतिनिधी :-
सविस्तर वृत्त असे की श्रीवर्धन, बोर्ली पंचतन व म्हसळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मटका जुगार,व्हिडिओ गेम,लॉटरी सारखे जुगार अड्डे राजरोसपणे चालू आसुन त्या संदर्भात वारंवार पोलिस प्रशासन कडे लेखी व न्यूज चे माध्यमातून तक्रारी करून सुद्धा हे धंदे राजरोस पणे चालू आसल्याचे चित्र दिसत आहे. तक्रारी दिल्या नंतर थातुर माथूर कारवाही करून परत हे धंदे अजून जोरात चालू होतात, जसे की पोलिस प्रशासनाने त्यांना लायसन दिले आहे. ह्या संदर्भात Dy.Sp श्रीवर्धन यांनी कारवाही करणे सोडाच, तक्रारीची दखलही घेतली जात नसल्याचे जनतेचे म्हणणे आहे.
हे सर्व जुगाराचे धंदे श्रीवर्धन मधील समीर पोलेकर ही व्यक्ती चालवत आसल्याचे स्पष्ट झालेले आहे. तरी माहीत असून सुद्धा समीर पोलेकर वर कारवाही का होत नाही? ह्याचे उत्तर पोलिस प्रशासन देऊ शकेल का? ह्याचे श्रीवर्धन मध्ये कसबा पेठेतील साक्षी कलेक्शन समोर प्रदीप बंदरकर ह्यांच्या गळ्यामध्ये व्हिडिओ गेम,मटका जुगाराचा अड्डा चालू. आहे तसेच बोर्ली पंचतन मध्ये रोहिदास नगर, बौद्ध विहाराच्या समोर,मोहिनी झेरॉक्स चे मागे अक्षय अंजरलेकर हा मटक्याचे हेड ऑफिस सांभाळतो. म्हसल्या मध्ये उदय म्हशिलकर, गणेश बिरवाडकर हे त्याचे जुगाराचे धंदे सांभाळतात. आश्या व्यक्तीवर कारवाही का होत नाही ह्याचे उत्तर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन यांनी प्रेस कॉन्फरन्स चे माध्यमातून द्यावे. अशी मागणी जनतेतून होत आहे, ह्या अशा अवैध धंद्यांच्या विरोधात एका पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष यांना व त्यांच्या महिला सहकाऱ्यांना उपोषणाला बसण्याची वेळ येते. ज्या रायगड पोलिसांना महाराष्ट्रात पहिल्या नंबरचा पुरस्कार मिळतो, त्या रायगड पोलिसांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
काय या म्हसळा, श्रीवर्धन आणि बोर्ली येथे कार्यरत असणाऱ्या पोलिस अधिकार्यांवर तत्काळ कारवाई करून सदर अधिकाऱ्यांची बदली करून जनतेला न्याय मिळेल का? की परत येरे माझ्या मागल्या ,.........
ह्या संदर्भात रायगड पोलिस अधीक्षक श्री.अशोक दुधे साहेब काय ठोस भूमिका घेतात, की मग मी मारतो तू लागल्या सारखं कर. अशी भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना वसुलीसाठी रान मोकळ करून देतात. ह्या गोष्टी कडे संपूर्ण जिल्हा चे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "म्हसळा श्रीवर्धन तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत... पोलीस विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष... श्रीवर्धन व म्हसळा तालुक्या मध्ये चालू आसलेल्या जुगार अड्ड्या विरोधात पोलिस अधीक्षक कार्यालय समोर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष हिरवे साहेब उपोषणाला बसणार..!"
टिप्पणी पोस्ट करा