मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा मध्ये काय ते मटक्याचे धंदे काय ते विडिओ गेम व लॉटरी धंदे पोलीस प्रशासन एकदम ओके मध्ये झोपेत,दिघी नका येथे अवैध व्हिडीओ गेम आणि लोटरी व्यवसाय!

म्हसळा मध्ये काय ते मटक्याचे धंदे काय ते विडिओ गेम व लॉटरी धंदे पोलीस प्रशासन एकदम ओके मध्ये झोपेत,दिघी नका येथे अवैध व्हिडीओ गेम आणि लोटरी व्यवसाय!


म्हसळा प्रतिनिधी
: म्हसळा येथील प्रसिद्ध असणारे ठिकाण म्हणजे दिघी नका या ठिकाणी उभारण्यात आलेली बनकर परबलकर इमारतिच्या तळमजल्यावर अवैध व्हिडीओ गेम आणि लोटरी चा व्यवसाय सुरु असून सदर व्यवसाय सम्बन्धी प्राथमिक माहिती घेतली असता हा व्यवसाय सरकारमान्य असल्याचे समजते मात्र त्यासंदर्भातील कागदोपत्र पुरावे देण्यास मात्र सदर व्यावसायिक तसेच कर्मचारी असमर्थ ठरत आहेत तरी या संदर्भात एका इसमाने दि;२१/०८/२०२२ रोजी म्हसळा पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक यांना पत्र्द्वारे सदर व्यावसाय संदर्भात माहिती मिळावी. या संदर्भात पत्रव्यवहार केला असून सदर व्यवसायाचे मालक यांचे देखील माहित मिळावी. 

मटका जुगाड,व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटर सारखे अवैध धंदे खुलेआमपणे चालू झाल्याचे दिसून येत आहेत, व्हिडिओ गेमच्या नावाखाली तरुण पिढी जुगार खेळत असल्याचा समजतंय. कोरोना महामारीच्या काळात सर्वच धंदे रोजगार ठप्प झाले होते सध्या अनलॉक फेज आहे पूंन्हा एकदा रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे, त्याचा काही माफिया वृत्तीचे लोक दादागिरी करून गैरफायदा घेत म्हसळा शहरात अवैध धंदे करत आहेत. दि.२२/०८/२०२२ रोजी मटका माफियांवर पोलिसांकडून कारवाई सुद्धा झाली होती परंतु काही लोकांच्या दादागिरीने हे अवैध धंदे पुन्हा एकदा सुरू झाल्याचे आढळून येत आहे, पोलीस ज्या ठिकाणी मटका जुगाड कधी कोणाच्या घरी ते कधी कुटल्या गाल्या मध्ये सुरू असते पोलीस फक्त त्या ठिकाणी जो कोणी आरोपी आढळून येते त्या इसमावर कारवाई करताना दिसत आहेत परंतु ज्या घरी ज्या गाल्या मध्ये मटका जुगाड सुरू असते त्या मालकावर कारवाई का नाही?

तरुण पिढी वाममार्गाला जात आहे शिक्षण घेण्या एवजी लॉटरी व व्हिडिओ पार्लरच्या नावाने चालणाऱ्या खोट्या सेंटरना आपलं अमूल्य वेळ व पैसा देत आहेत या संदर्भात गोरगरीब पालक व नागरीक चिंता व्यक्त करत आहेत म्हणून याची चौकशी करून हे सर्व अवैध व्यवसाय लवकरात लवकर बंद करण्याची मागणी पालकवर्ग व सामान्य नागरिकांकडून होत आहे, ह्या लॉटरी व व्हिडिओ पार्लरच्या नावाने चालणाऱ्या खोट्या सेंटर वर नक्की कोण मेहेरबान आहे याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन व म्हसळा पोलीसांनी करणे अपेक्षित आहे.  

श्रीवर्धन, म्हसळा, बार्ली या तीन ठिकाणी लॉटरी, विडिओ गेम, मटका जुगाड चालवणारा वेक्ती/माफिया श्रीवर्धनचा असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

  सध्या गणपती सन जवळ येत असल्याने अनेक मुंबई करी मंडळी गावी येत असून एक मनोरजांचे साधन म्हणून जरी याकडे पहिले तरीही बघता बघता सदर खेळाची ओढ लागते तरी प्रशासनाने असे सामाजिक अहितकारक असणारे खेळ बंद करावेत अशी मागणी म्हसळा वासियान्क्डून होताना दिसून येते

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा मध्ये काय ते मटक्याचे धंदे काय ते विडिओ गेम व लॉटरी धंदे पोलीस प्रशासन एकदम ओके मध्ये झोपेत,दिघी नका येथे अवैध व्हिडीओ गेम आणि लोटरी व्यवसाय!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...