मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महाड मधे राष्ट्रवादीला खिंडार,शेकडो कार्यकर्त्यांसह जमीर देशमुख यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश!

महाड मधे राष्ट्रवादीला खिंडार,शेकडो कार्यकर्त्यांसह जमीर देशमुख यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश!


विशेष प्रतिनिधी - अबरार अमीन
: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (कै.)फैरोज खान देशमुख यांचे सुपुत्र जमीर देशमुख यांनी बुधवार १७ ऑगस्त २०२२ रोजी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रे दरम्यान महाड मधे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. 

मतदार संघातील विकासकामांना चालना मिळण्यासाठी व ज्या पद्धतीने पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री.उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत गद्दारी करून पाठीत खंजीर खुपसला व या आमदारां मध्ये महाडच्या आमदारांचा ही समावेश आहे,महाडच्या ऐतिहासिक भूमीला जे काही कलंक लावण्याचा काम केला गेलाय तो माझ्या सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला सहन नं होणारा आहे.येणाऱ्या निवडणुकीत आपण या गद्दारांना लोकशाही मार्गाने धडा शिकवण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या विचारांवर व माजी केंद्रीयमंत्री.अनंतजी गीते व अमितजी मोरे यांच्या नतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेचा मार्ग स्वीकारल्याचे जमीर देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच महाड तालुक्याचे माजी सभापती असलेल्या (कै.) फैरोज खान देशमुख यांनी तालुक्यात आपली पकड मजबूत केली होती.कोणत्याही विभागात उभे राहून निवडून येणारे ते महाड राष्ट्रवादीचे एकमेव नेते होते,काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले, त्यांच्या निधननंतर त्यांचे दोन्ही सुपुत्र राष्ट्रवादीत होते.रीहान देशमुख हे ज्येष्ठ पुत्र असून ते आजही राष्ट्रवादीत राज्यावर पद्युक्त आहेत परंतु जमीर देशमुख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत जय महाराष्ट्र केला आहे.जमीर देशमुख यांना खूप मोठा राजकीय वारसा आहे वडील माजी सभापती आई माजी जि.प.सदस्य म्हणून जमीर देशमुख यांना भविष्यात पक्षा कडून मोठी जबाबदारी मिळणार हे नक्की आहे,या सोबतच त्यांच्या या निर्णयाचा फटका खाडी पट्टा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँगेस या दोन्ही पक्षांना बसण्याची शक्‍यता आहे.

या वेळीस जमीर देशमुख यांच्यासह अब्दुल रब झामाने,जुहेब देशमुख, मोहम्मद खान देशमुख,मनोज निर्मल,नितीन भावे,कल्पेश सुतार,योगेश पवार,मतीन पल्लवकर, दानिश पल्लवकर, रईस देशमुख,उमारखन देशमुख, माहीर देशमुख,फहीम कादरी,अनस देशमुख, दाउद देशमुख,हसन खान देशमुख, अमजद पठाण,सईम पाल,सरोश देशमुख आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "महाड मधे राष्ट्रवादीला खिंडार,शेकडो कार्यकर्त्यांसह जमीर देशमुख यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...