
मावळतवाडीला (आंबेतकोंड) स्वप्नातील गावाचा दर्जा.!
ग्रामस्थांनी ध्येयाने लावला हात,
स्वदेस फाउंडेशनची लाभली उत्तम साथ...
आंबेत प्रतिनिधी- अब्रार झटाम : स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड मधील ७५ गावे हि स्वप्नातील गावे म्हणून घोषित करण्यात येत आहेत.यामध्ये म्हसळा तालूक्यातील ग्रुप ग्राम पंचायत आंबेत मधील 'मावळतवाडी' (आंबेतकोंड) स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.
आपले गाव स्वप्नातील गाव बनवण्याच्या उद्देशाने गावविकास समिती व ग्रामस्थ यांनी स्वदेस फाउंडेशन या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मागील अडीच-तीन वर्षापासून वाडीतील लहान थोर मंडळीनी एकत्र येऊन सुरुवात य़ा कामास सुरुवात केली. सुरुवातीला आवश्यक असणाऱ्या आपल्या गावच्या गरजा एकत्रित येऊन काढल्या. यानंतर स्वछ्य , सुंदर , स्वास्थ्य , सम्रूद्ध आणि सक्षम य़ा मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा तयार केला आणि हि सर्व विकासात्मक कामे स्वदेस, शासन तसेच ग्रामस्थ यांच्या मार्फत करन्यास सुरुवात केली,शेवटी कठोर परिश्रमानंतर मावळतवाडी स्वप्नातील गाव म्हणून घोषित झाले.
सदर कार्यक्रमास लोकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी वन अधिकारी प्रवीण शिंदे, वनअधिकारी लक्ष्मण ईंगोले, वणरक्षक अमोल सोनार, स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, म्हसळा तालुका व्यवस्थापक शिवतेज ढऊळ,ग्रुप ग्रामपंचायत आंबेतचे सरपंच अफरोजा डावरे, उपसरपंच सौ.ह्रूतूजा राजेंद्र सावंत,माजी सरपंच उपसरपंच श्री.पांडुरंग आंबेकर,स्वदेस फाउंडेशनचे सदैव गावपातळीवर मार्गदर्शन करणारे कौस्तुभ काम्बले,अल्केश शिंदे आणि सहकारी तसेच गावविकास समिती,पंचक्रोशीतील बहुतांश नागरिक मोठ्या संख्येने हा कौतुकाचा आणि अभिमानाचा सोहळा पाहण्यास उपस्थित होते.
तसेच या सोहळ्यास प्रभाकर चव्हाण , महादेव गोठल, श्रीकांत भावे, रामचंद्र भावें विशेष सहकार्य करणारे महिला मंडळ, मुम्बईकर यांचे प्रामुख्याने सहकार्य लाभले.
स्वातंत्र्याचा ७५ अमृत महोत्सव वर्षा निमित्त या सोहळ्यास 'आमच्या स्वप्नातला' गाव या नामफलकाचे अनावरण ग्रूप ग्राम पंचायत आंबेतच्या सरपंच श्रीमती.अफरोजा डावरे यांच्या हस्ते करण्यात आले.या लोकुप्योगी उपकरामाचा आदर्श घेऊन बाकी गावांनी सुद्धा असा पॅटर्न राबवावा असा संदेश या सोहळ्या निमित्त देण्यात आला.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "मावळतवाडीला (आंबेतकोंड) स्वप्नातील गावाचा दर्जा.!"
टिप्पणी पोस्ट करा