
आंबेतकोंड येथे 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन उत्साहात साजरा !
मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२
Comment
आंबेत प्रतिनिधी - अब्रार झटाम : भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव म्हणून सर्व देशात साजरा केला गेला. गेले तीन दिवस हर घर तिरंगा या उपक्रमाचे पालन करत सर्व ग्रामस्थांनी हा स्वातंत्र्याचा सुवर्ण दिवस आनंदात साजरा केला. आंबेतकोंड प्राथमिक शाळेतील ध्वजारोहन झाल्यानंतर समाजमंदिरामध्ये भारताच्या स्वातंत्र्यचा 75 वा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यासाठी आंबेतकोंड मधील सर्व ग्रामस्थ,तरुण महिलावर्ग सर्वच कार्यक्रमा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले.
भारत भूमीला स्वातंत्र करण्यासाठी अनेक हुतात्म्यानी, क्रांतीवीरांनी आपल्या देशासाठी एकत्र येऊन स्वातंत्र्य मिळवुन दिले त्याप्रमाणेच गावातील सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन गावच्या विकासात्मक प्रगतीच्या दिशेने , आत्मनिर्भर बनण्याच्या द्रुष्टीने वाटचाल करण्याचा निश्चय केला,तसेच उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन सर्व ग्रामस्थांना मिळाले.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "आंबेतकोंड येथे 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन उत्साहात साजरा !"
टिप्पणी पोस्ट करा