
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तिरंगा बाईक रॅली संपन्न.!
७५वा अमृत महोत्सव देशभर उत्साहाने साजरा होत आहे सर्व शाळा महाविद्यालय विद्यार्थी व सर्व नागरिक तिरंगा हातात घेऊन तिरंग्याला अभिवादन करत आहेत,गेली काही दिवस देश व राज्यातील नागरिकांचा उत्साह पाहता आपल्या गावातील नागरिकांच्या व विशेष करून तरुणांच्या देशाप्रती असलेल्या आदर भावना या रॅलीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला.
या रॅलीचे आयोजन सामजिक कार्यकर्ते व युवासेना म्हसळा तालुका समन्वयक अबरार अमीन व मॉमेडियन स्पोर्ट्स क्रिकेट क्लब.आंबेत यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले, रॅलीची सुरुवात महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या भव्य रॅली मध्ये शेकडो तरुण दुचाकी स्वार व सायकल स्वार विद्यार्थी ही सहभागी झाले रॅलीमध्ये देशभक्तीपर गीते रॅलीत गाण्यात आली यावेळी तरुणांनी केलेल्या हिंदुस्तान झिंदाबाद व भारत माता जय जयघोषामुळे आंबेत गाव दुमदुमले सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
या तिरंगा रॅलीमध्ये गावातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला,या बाईक रॅलीची सुरुवात सावित्री माध्यमिक विद्या मंदिर शाळेपासून झाली त्या नंतर एस.टी.बस स्टॅण्ड,गणेश नगर,सावंत आळी व बुद्धावाडी करत मोहल्ल्यात आली पुढे ही रॅली आंबेत पोलिस चेक पोस्टहून प्राथमिक आरोग्य केंद्रा कडे गेली शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय घोष करून रॅलीचा समारोप करण्यात आला.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तिरंगा बाईक रॅली संपन्न.!"
टिप्पणी पोस्ट करा