मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पांगळोली गावचे सरपंच श्री.बिलाल कौचाली यांना झालीय काम न करण्याची बाधा!

पांगळोली गावचे सरपंच श्री.बिलाल कौचाली यांना झालीय काम न करण्याची बाधा!


म्हसळा प्रतिनिधी:- पांगळोली गावचे नेहमीच चर्चेत असणारे युवा सरपंच श्री. बिलाल कौचाळी हे सरपंच पदी विराजमान झाल्यापासून कोणत्याही प्रकारे विकास कामे झाली नाहीत तर वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून देखील सरपंच अजून हि झोपेचं सोंग घेवून आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतो.तसेच सरपंच विरुद्ध पंचायत समिती म्हसळा यांच्याकडे अनेक वेळा तक्रार देऊन ही पंचायत समिती काही कारवाई करत नसल्याने सरपंच हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने तसेच सरपंच श्री.बिलाल कौचली चे वडील श्री.अलिशेठ कौचालि हे राष्ट्रवादीचे नेते असल्यानेच म्हसळा पंचायत समिती कारवाई करत नाही का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारताना दिसून येत आहे. 

तर पांगळोली ग्रामपंचायत म्हणजे सरपंचांच्या बाप की मालकी असल्याचे देखील बोलले जात आहे. कारण गावात दुष्काळ परिस्थिती, पांगलोळी गावामध्ये अनेक ठिकठिकाणी पुन्हा एकदा कचऱ्याचा साम्राज्य तयार झाला असून पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच पांगलोळी गावात गटारांची दुरावस्था झाली असून,देखील सरपंच मात्र निवांत दिसून येत आहेत.

तर ग्रामसेवक श्री.केसकर यांनी शासकीय कागद पत्र पूर्ण केली नसल्याचे एका माहितीच्या अधिकारा अंतर्गत आढलुन आले होते.त्या संदर्भात सदर ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते श्री. अझहर धनसे यांनी मागणी केली होती. तसेच श्री.केसकर यांच्याकडील तिन्ही ग्रामपंचायतीचा कार्यभार कमी करण्यात आले असून मात्र आज ही सदर ग्रामसेवक हे ग्रामपंचायत मध्ये राजरोस पने काम करतो आहे. तर खरचं प्रशासन सदर सरपंचवर कारवाई करील का की लोकांना वाऱ्यावर सोडून देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे?

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "पांगळोली गावचे सरपंच श्री.बिलाल कौचाली यांना झालीय काम न करण्याची बाधा!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...