मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यात होणाऱ्या अपघातांमध्ये चूक नेमकी कुणाची?  मनमर्जी कारभार करणाऱ्या कंत्राटदाराची, प्रशासकीय अधिकारी की नालायक स्थानिक राजकारणी यांची!

म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यात होणाऱ्या अपघातांमध्ये चूक नेमकी कुणाची? मनमर्जी कारभार करणाऱ्या कंत्राटदाराची, प्रशासकीय अधिकारी की नालायक स्थानिक राजकारणी यांची!


म्हसळा प्रतिनिधी
: गेल्या काही वर्षांत दिघी पोर्ट संदर्भात सुरू असलेल्या नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचं सुरू असलेलं काम त्याच बरोबर ठीक ठिकाणी प्रशासन आणि स्थानिक नेते यांच्या हलगर्जी पणामुळे अनेक ठिकाणी राज्य महामार्गाला पडलेले खड्डे यांमुळे म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढलेली दिसते.

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील घोणसे घाट येथे बस चा झालेला भीषण अपघात पाहता,तसेच सदरच्या अपघातात मोठ्या प्रमाणात जखमिंची संख्या होती तर ३ मृत्यू झाले होते.तसेच १६ मे रोजी श्रीवर्धन तालुक्यातील धारवली - साखरोने या गवांदरम्यान झालेला एस. टी चा अपघात, तसेच आज पुन्हा एकदा सकाळी घोणसे घाटात झालेला सिमेंट ची वाहतूक करणाऱ्या मालगाडी(ट्रक) चा झालेला अपघात पाहता. सद्या रायगड जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू असल्याचं काहीस चित्र निदर्शनास येते.आणि कुठेतरी मग प्रश्न निर्माण होतो.की यात नेमकी चूक कुणाची !! राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्रादाराची की आपापली पाकीट वेळेवर मिळतात.म्हणून मूग गिळून गप्प राहणाऱ्या प्रशासकीय अधिकारी यांची की समाजसेवेचा आव आणत पैसे उकळणाऱ्या स्थानिक राजकीय नेत्यांची असा संभ्रमावस्थेत टाकणारा प्रश्न उभा राहतो.

कारण दिघी पोर्ट कडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचं काम जोमात सुरू असले.तरीही ठिकठिकाणी दिशा दर्शक फळकच लावले जात नाहीत.तर कंपनीचे अभियंते आपल्या पद्धतीने काम करीत असताना अनेक ठिकाणी घातक वळणांवर सुद्धा अपघाती वळण असे फलक लावायला विसरत आहेत.आणि याचा त्रास मात्र सामान्य जनतेला होताना दिसत आहे.

आणि यावर लक्ष घालण्यासाठी असणारे सगळे प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नेते मात्र मूग गिळून गप्प राहण्या मागचं कारण अद्याप समजू शकत नसल्याने कंत्राटदाराकडून यांना खरचं टेबलाखाळून काही चिरीमिरी तर मिळत नाही ना! असा प्रश्न प्रत्येक सामान्य म्हसळा आणि श्रीवर्धन वासियांच्या मनात उत्पन्न होत आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यात होणाऱ्या अपघातांमध्ये चूक नेमकी कुणाची? मनमर्जी कारभार करणाऱ्या कंत्राटदाराची, प्रशासकीय अधिकारी की नालायक स्थानिक राजकारणी यांची!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...