
मान्सून लवकरच होणार सक्रिय
सोमवार, १६ मे, २०२२
Comment
मुंबई प्रतिनिधी सोहेल शेख :- मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांजवळ मान्सूनची प्रगती वेगानं होताना दिसत आहे.26 मे रोजी केरळ तसंच अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व सरी लवकरच बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.शनिवारी वर्धा येथे सर्वाधिक 46.5 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली होती. तर महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी कमाल तापमान 29.7 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली दरम्यान, देशातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे.जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. हा पहिला अंदाज आहे.
मुंबई प्रतिनिधी सोहेल शेख :- मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांजवळ मान्सूनची प्रगती वेगानं होताना दिसत आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "मान्सून लवकरच होणार सक्रिय"
टिप्पणी पोस्ट करा