मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल!

किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल!


पुणे प्रतिनिधी : पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक  किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     किडनी रॅकेटप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली, असा आरोप त्यांच्यावर आहे. कोल्हापूरच्या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागले.

संबंधित महिलेने आणि एजंटांनी बनवून दिलेली खोटी कागदपत्रे याची सत्यता पडताळणी डॉ. तावरे अध्यक्ष असलेल्या विभागीय प्रत्यारोपण समितीने केली नसल्याचा ठपका समितीवर ठेवण्यात आला.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...