
श्री. प्रभे प्रभारी गटविकास अधिकारी म्हसळा ते नांदेड व्हाया माणगाव परत म्हसळा कशासाठी व का ? असा प्रश्न म्हसळयातील सामान्य ग्रामीण जनतेला.
बुधवार, ४ मे, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी : म्हसळा तालुक्याचे गट विकास अधिकारी हे पद रिक्त ठेवण्याचे प्रयोजन काय ? तसेच म्हसळा गटाचा अतिरिक्त असलेला कार्यभार म्हसळा जवळच्या श्रीवर्धन अगर तळा या लहान गटाचे गट विकास अधिकारी यांचेकडे न देता मराठवाडयाच्या मैदानात लाईन टच न करता अंशःत बदल करून या प्रशासनाच्या गोंडस आदेशाने परत संबधितांची रायगडात माणगाव येथे बदली आणि पुनश्च म्हसळा गटाचा अतिरिक्त कार्यभार याचे काय गोड बंगाल हे समजुन येत नाही. नुकतीच झालेली बदली आणि त्यापुढे झालेली सर्व कावेबाजी म्हंजे नक्कीच म्हसळा तालुक्यात काहीतरी उठाठेवी,किंवा काहीतरी चुकीचं घडत असल्याचे काही प्रश्न निर्माण करीत आहेत. विकास कामांच्या व प्रशासकीय दृष्टीने म्हसळा तालुक्याला पुर्णवेळ गट विकास अधिका-यांची गरज आहे. ग्रामीण भागातील जनतेचे जिव्हाळयाचे दैनंदिन प्रश्न असतात. सदर प्रश्नांची सोडवणूक करणेसाठी तालुक्याच्या ८४ गावांमधून सर्वसाधारण ३० ते ४० कि.मी. वरून नागरिक येत असतात. परंतु गट विकास अधिकारी नसल्यामुळे ते निराश होऊन परत जातात. प्रभारी गट विकास अधिकारी मनाला वाटेल तेव्हा स्वाक्षरीसाठी येत असतात. गट विकास अधिकार्यांच्या या मनमर्जी कारभारमुळे म्हसळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासना वरील विश्वास नाहीसा होत असल्याचे चित्र दिसून येते तर एकीकडे प्रशासन जनतेला प्रत्येक वेळी तरी सहकार्य करण्याचे आवाहन करीत असताना,प्रशासकीय अधिकारी मात्र स्वतःच्या मनमर्जी कारभार करीत असल्याचे दिसून येते. म्हसळा गटाला पुर्णवेळ गट विकास अधिकारी किंवा सध्या तात्पुरता शेजारच्या लहान गटातील श्रीवर्धन अगर तळा गट विकास अधिका-यांक्डे कार्यभार सोपवाव�
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "श्री. प्रभे प्रभारी गटविकास अधिकारी म्हसळा ते नांदेड व्हाया माणगाव परत म्हसळा कशासाठी व का ? असा प्रश्न म्हसळयातील सामान्य ग्रामीण जनतेला."
टिप्पणी पोस्ट करा