
महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्तीचे आरोग्यमंत्री टोपेंनी दिले संकेत!
बुधवार, २७ एप्रिल, २०२२
Comment
मुंबई प्रतिनिधी - सुहेल शेख :- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होऊ शकते, असे संकेतही दिले. तसेच,
“गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. त्या दृष्टीने एक साधारण चर्चा झाली आहे.” असं आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले.
माध्यमांना बैठकी संदर्भात माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, “प्रामुख्याने पंचसूत्री जी आहे त्यानुसार कार्यवाही आपण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने आम्ही असं ठवरलं आहे की, पहिलं सूत्र म्हणजे तपासण्या, तर आज आपण २५ हजारांपर्यंत दररोज तपासण्या करत आहोत. ही २५ हजारांची तपासणी आम्ही निश्चितपणे वाढवू. कारण, किरकोळ स्वरुपात… महाराष्ट्र हे तसं जर पाहिलं तर मी म्हणेण खूप सुरक्षित झोनमध्ये आहे. चिंता करण्याची परिस्थिती अजिबात नाही आणि घाबरण्याचं देखील काही कारण नाही. याचं कारण म्हणजे ९२९ आज अॅक्टीव्ह केसेस आहेत, महाराष्ट्राने एका एका दिवशी ६५ ते ७० हजार केसेस बघितलेल्या आहेत. त्यामुळे एकंदर पर मिलियनमध्ये आपण खूप खाली आहोत. महाराष्ट्र पर मिलियन केसेसमध्ये केवळ सात आहे.
म्हणजेच दर दहा लाखांमागे महाराष्ट्रात सात केसेस आहेत.
“काळजी घ्या आणि कार्यवाही करा या संदर्भात ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये टेस्टिंग आम्ही नक्कीच वाढवू, ट्रॅकींग करू आणि गरजेप्रमाणे निश्चित उपचार करू. त्याचबरोबर जर काही पॉझिटिव्ह आढळले तर ज्याबाबात जे जिनोमिंक सिक्वेन्सिंग आहे, ते देखील करायला सांगितलं. कारण, आपल्या देशात तरी ओमायक्रॉनच सर्वदूर आहे. जरी त्याचे काही व्हेरिएंट्स जरी असले तरी, ते ओमायक्रॉनचेच खऱ्या अर्थाने भाग आहेत. म्हणून तसा काही वेगळा व्हेरिएंट निर्माण झालाय, असा काही भाग नाही. परंतु तरी देखील जिनोमिक सिक्वेन्सिंग करायला सांगितलं आहे, ते देखील आम्ही करू.” अशी देखील माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्तीचे आरोग्यमंत्री टोपेंनी दिले संकेत!"
टिप्पणी पोस्ट करा