मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तालुक्यात धनदांडग्यांचा मनमर्जी कारभार प्रशासन तरीही मूग गिळून गप्प!

म्हसळा तालुक्यात धनदांडग्यांचा मनमर्जी कारभार प्रशासन तरीही मूग गिळून गप्प!


म्हसळा प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून धन दांडग्यांचा मनमर्जी कारभार दिसून येत आहे. अगदी सर्वांसाठी समान कायदे असताना म्हसळा तालुक्यात मात्र सर्वसामान्य जनतेसाठी वेगळे आणि धनवान लोकांसाठी वेगळे कायदे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. याचीच प्रचिती म्हसळा शहरानजीक असलेल्या सुरई फाटा शेजारी, साई चेकपोस्ट म्हसळा बायपास रोड, अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती आणि दगड यांचा भराव सुरू असल्याचे दिसून येते. सदर प्रकरणा बाबत तहसील कार्यालय म्हसळा येथे चौकशी केली असता, मिळालेल्या माहिती प्रमाणे सदरचे उत्खननाचे काम बायपास रोड,पेट्रोल पंप म्हसळा शेजारी सर्व्हे नं.१३/अ हि. नं १/३ मध्ये माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली.

तसेच सदर उत्खनन आणि भराव संदर्भात माहिती घेतली असता. सुरई फाटा या ठिकाणी भरावसाठी ४०० ब्रास माती ची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सदर ठिकाणी पाहणी करता सुरई फाटा शेजारी सुध्दा ४०० ब्रास पेक्षा जास्त मातीचा भराव केला असल्याचे दिसून येते.
तसेच सुत्रांद्वारे मिळालेल्या माहिती प्रमाणे साई चेकपोस्ट म्हसळा,बायपास रोड म्हसळा अशा इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात माती आणि दगड यांचा साठा केला असल्याचे दिसून येते.
सदरची ठिकाणे ही म्हसळा तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयापासून काहीच किलोमीटरच्या अंतरावर असताना तसेच इतर ठिकाणहून येणाऱ्या शासकीय अधिकारी यांच्या येण्याजण्याच्या मार्गावर असताना कोणत्याही शासकीय अधिकार्याचे निदर्शनास कधीचं आली नाहीत का? की प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी मुद्दामहून डोळेझाक करीत आहेत.असा सवाल म्हसळा तालुक्यातील सर्वसामान्य जनता विचारत आहेत.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : 

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा तालुक्यात धनदांडग्यांचा मनमर्जी कारभार प्रशासन तरीही मूग गिळून गप्प!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...