मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमी महाड चे रायगड जिल्हा अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये घवघवीत यश!

चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमी महाड चे रायगड जिल्हा अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये घवघवीत यश!


महाड प्रतिनिधी - पराग वडके
: पिल्ले HOC स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रसायनी येथे रायगड जिल्हा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ सीनियर व ज्युनियर दिनांक ९ व १० एप्रिल २०२२ रोजी संपन्न झाले. या स्पर्धेत महाडमधील चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामधील १२ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे:

१) अतिफ लंबाडे डेकॅथलोन प्रथम क्रमांक

२) ओंकार जाधव डेकॅथलोन द्वितीय क्रमांक 

३) सौजन्य काणेकर गोळा फेक द्वितीय क्रमांक

४) पल्लवी सावंत उंच उडी प्रथम क्रमांक

५) सिद्धेश शिगवण  डेकॅथलोन प्रथम क्रमांक (ज्युनिअर)

६) रविराज राणे ३ किलोमीटर प्रथम क्रमांक

७) रुतीका शिंदे १०० मीटर धावणे

८) जय घरत ४०० मीटर हडल्स प्रथम क्रमांक

९) स्वरुपा लाखन हेपेथलोन प्रथम क्रमांक

१०) उदित शिगवण १० किलोमीटर चालणे प्रथम क्रमांक

११) सूरज शिगवण ५ किलोमीटर धावणे द्वितीय क्रमांक

१२) शिवम राजीवडे १० किलोमीटर धावणे द्वितीय क्रमांक

या सर्व महाडच्या खेळाडूंची दिनांक २१, २२ व २३ एप्रिल २०२२रोजी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सीनियर व ज्युनियर एथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये रायगड जिल्ह्याच्या ॲथलेटिक्स संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे मोलाचे काम *श्री.विनायक शिर्के व श्री.समीर गाडगीळ हे करत आहेत.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : निकेश कोकचा

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमी महाड चे रायगड जिल्हा अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये घवघवीत यश!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...