
खा.शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचा म्हसळा राष्ट्रवादी तर्फे मूक मोर्चा काढून निषेध!
शनिवार, ९ एप्रिल, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी- निकेश कोकचा :
8 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी संपकऱ्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ग्रामीण रुग्णालय ते तहसील कार्यालय पर्यंत मूक मोर्चा काढला.यानंतर शासनाला तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देऊन या हल्ल्या मागे असणाऱ्या अज्ञात शक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, महिला तालुका अध्यक्ष रेश्मा कानसे,सभापती छाया म्हात्रे, उप सभापती संदीप चाचले,जेष्ठ सरपंच अंकुश खडस,माजी सभापती महादेव पाटील, अशोक काते,पंचायत समिती सदस्य मधू गायकर, वठणे गण अध्यक्ष सतीश शिगवण,रियाझ फकी,सरपंच अनिल जोशी,राजू लाड,शाहिद उकये,राजू गोलाबरे,भाई बोरकर,गजानन पाखड,महिला शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर, नगरपंचायत गट नेते संजय कर्णिक, नगरपंचायत सभापती संजय दिवेकर ,चंद्रकांत कापरे,सरोज म्हशीलकर,नगरसेवक करण गायकवाड,नगरसेविका मेजबिन दळवी,फरीन बशारत,वृषाली घोसाळकर,प्रकाश गाणेकर,गजानन जंगम,अनिल टिंगरे,नदीम दळवी,कासीम मेमन,सलीम चोगले,स्वप्नील चांदोरकर यांच्या सहित राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : --------//////////
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "खा.शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचा म्हसळा राष्ट्रवादी तर्फे मूक मोर्चा काढून निषेध!"
टिप्पणी पोस्ट करा