मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात जागतीक आरोग्य दिवस  साजरा

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात जागतीक आरोग्य दिवस साजरा


प्रतिनिधी मकसुद नजिरी श्रीवर्धन :-
दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो .याची सुरुवात १९५० मध्ये करण्यात आली होती. याचा मुख्य उद्देश जागतिक आरोग्य व त्याच्याशी संबंधित समस्यावर विचार करणे तसेच जगभरात आरोग्य सेवा सुविधा विषयी जागरूकता पसरवणे व गैरसमज दूर करणे हा आहे.त्याचे औचित्य साधत उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन येथे डॉ.  मधुकर ढवळे यांच्या कडून रुग्णालयात उपस्थित रुग्णांच्या नातेवाईक याना मार्गदर्शन करून निसर्गा बरोबर राहण्याचे तसेच घराबाहेर झाडे लावा. परिसर स्वच्छ ठेवा.  प्रदूषण कमी करा. आजारा पासून दूर रहा.   जेवणात पाले भाज्यांचे जास्तीत जास्त वापर करा.  व्यसनांपासून दूर राहा. हे  जीवन पुन्हा  नाही.असे मोलाचे सल्ले दिले.  यावेळी आपली पृथ्वी आपले आरोग्य घोष वाक्य तयार करण्यात आले होते. उपस्थित रुग्णांचे नातेवाईक यांना  केलेले मार्गदर्शन शांतचित्ताने ऐकल्या बद्दल डॉ मधुकर ढवळे यांनी सर्वांचे आभार मानले.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : --------//////////

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात जागतीक आरोग्य दिवस साजरा"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...