
पेट्रोल डिझेलच्या किमतीत सर्वात अधीक वाढ महाराष्ट्र राज्यात!
बुधवार, ६ एप्रिल, २०२२
Comment
मुंबई विशेष प्रतिनिधी : सुहेल शेख : देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर 22 मार्च रोजी पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर केवळ 16 दिवसांमध्येच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. आजची दरवाढ ही सोळा दिवसांत झालेली चौदावी वाढ आहे. 22 मार्च पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल 10 रुपयांनी महागलं आहे. तसेच आज सीएनजीच्या दरांतही अडीच रुपयांची वाढ झाली आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल 120.51 रुपये आणि प्रति लिटरज डिझेल 104.77 रुपयांवर पोहोचलं आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपयांवर पोहोचलं आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : --------//////////
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "पेट्रोल डिझेलच्या किमतीत सर्वात अधीक वाढ महाराष्ट्र राज्यात!"
टिप्पणी पोस्ट करा