मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महाड तालुक्यातील जुई येथे शूटिंग बॉल स्पर्धा आमदार चषक संपन्न!

महाड तालुक्यातील जुई येथे शूटिंग बॉल स्पर्धा आमदार चषक संपन्न!

विशेष प्रतिनिधी- मूहिब पलवकर :सगळीकडे सद्या क्रिकेटच आकर्षण असताना महाड तालूक्यात आगळीवेगळी आमदार चषक शूटिंग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाड - पोलादपूर - माणगाव चे आमदार श्री.भरतशेठ गोगावले सो.यांच्या माध्यमातून शूटिंग बॉल क्लब जुई यांच्या वतीने दि-२६मार्च २०२२ रोजी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी श्री.विकास गोगावले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमावेळी श्री. जितू भाई सावंत(जी.प.सदस्य),श्री.शोएब पाचकर (मा.सभापती महाड पंचायत समिती),जुई शूटिंग बॉल क्लब चे अध्यक्ष श्री.अस्लम काझी,सेक्रेटरी साजिद करबेलकर,अब्दुल्ला मुंडे,मोहम्मद अली करबेलकर,मोहम्मद अली मुंडे,युसुफ भाई फकिरे, सल्लौद्दिन पलवकर,पठाण जनाब,फहाद पालवकर,असिफ ढंगु,मूहिब पलवकर,इक्बाल मुंडे,फरझन देशमुख,परवेझ चोगले, शहजाद गीते,अहतिस्म काझी, ओवेस काझी, माजीद लोरे, सुफियान फकीरे, उस्मा काझी, अझमातुल्लाह पालवकर इ.मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेचे प्रथम क्रमांक पुणे, द्वितीय क्रमांक सिंधुदुर्ग,तृतीय क्रमांक अलिबाग,चतुर्थ क्रमांक जुई या संघांनी पटकावला. विजयी संघांना अनुक्रमे प्रथम १०,००० व चषक,द्वितीय ६,००० व चषक,तृतीय ४,००० व चषक,आणि चतुर्थ क्रमांक चषक असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : --------//////////

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "महाड तालुक्यातील जुई येथे शूटिंग बॉल स्पर्धा आमदार चषक संपन्न!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...