मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा तहसीलदार श्री.समीर घारे यांची गुंडागर्दी.. आपल्या अधिकाराचा करत आहेत गैरवापर!

म्हसळा तहसीलदार श्री.समीर घारे यांची गुंडागर्दी.. आपल्या अधिकाराचा करत आहेत गैरवापर!


म्हसळा प्रतिनिधी: सद्या सगळीकडे होळीची धामधूम सुरू असताना,कोकणात "होळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा " या उक्तीप्रमणे मोठ्या प्रमाणात चाकरमानी मिळेल त्या गाडीने कोकणात येत असतात.रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात सुद्धा हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो.यासाठी अनेक चाकरमानी गावी येत असतात ज्यामुळे ट्रॅफिक ची समस्या निर्माण होत असते.आणि म्हसळा बस स्टँड म्हसळा शहरातच असल्याने आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांमुळे ट्रॅफिक ची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असते. नागरिक त्रस्त असूनही कोणी ही या बद्दल काही बोलत नाही,मात्र दि -२०/३/२०२२ रोजी अशीच गर्दी असताना म्हसळा तालुक्यातील इक्बाल हज्वाने यांच्या मालकीच्या असलेली तसेच नरेश बारे यांच्या ताब्यात असलेली MH.43.H 4151 कोकण किनारा या वाहनातून होळी साठी गावी आलेली लोक म्हसळा एस. टी.डेपो च्या शेजारी असणाऱ्या स्वच्छता गृहाजवळ कोकण किनारा ही गाडी थांबवून स्वच्छता गृहात लघवी साठी गेली असता एस. टी.स्टँड शेजारी गर्दी असल्याने ड्रायव्हर ने आपली गाडी थोडी पुढे म्हणजे तहसीलदार यांच्या घराशेजारी उभी केली.एवढंच निमित्त मात्र तहसीलदार साहेबांनी ही गाडी पाहताच असलेल्या (लुंगी आणि गंजी) अवतारात बाहेर येऊन ड्रायव्हर कडे असलेल्या वहिवर जोरात आपले मातीचे हात मारले.तसेच ड्रायव्हर ला शिवीगाळ करत त्याच्या कमरेला असलेली गाडीची चावी खेचून घेतली,आणि ड्रायव्हर ने माफी मागून सुद्धा,आणि जो काही दंड पडेल तो देण्याची तयारी दाखवून सुध्दा चावी परत न देता शिवीगाळ करत, थांब तुला आता बांबू सारतो म्हणत चावी पोलिसांकडे जमा केली.कायद्यानुसार पोलिस कर्मचारी देखील गाडीची चावी काढत नाही तर तहसीलदार यांना हा अधिकार कुणी दिला.आणि त्यांनी गाडी ची चावी घेण्याचं कारण तरी काय असा सवाल म्हसळा वासिय विचारत आहेत,तरी सदर प्रकरणी म्हसळा तहसीलदार श्री.समीर घारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत असे मत श्री. बारे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले तसेच अनेक नागरिक ही व्यक्त करीत आहेत.तर लवकरच श्री.हजवाने हे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे मत व्यक्त केले.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : --------//////////

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा तहसीलदार श्री.समीर घारे यांची गुंडागर्दी.. आपल्या अधिकाराचा करत आहेत गैरवापर! "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...