मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ट्रू नेचर वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अझहर धनसे यांच्या तर्फे म्हसळा नगर पंचायतीला निवेदन सादर! विलंब न करता कार्यवाही करू नगराध्यक्ष श्री.असहल कादरी यांचे आश्वासन...

ट्रू नेचर वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अझहर धनसे यांच्या तर्फे म्हसळा नगर पंचायतीला निवेदन सादर! विलंब न करता कार्यवाही करू नगराध्यक्ष श्री.असहल कादरी यांचे आश्वासन...


विशेष प्रतिनिधी-म्हसळा :
म्हसळा शहारा मध्ये गेल्या ४-५ दिवसांपासून म्हसळा नगर पंचायत हद्दीत असणाऱ्या एस. टी. स्टँड च्या शेजारी असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छता गृहातील महिलांसाठी असणारे स्वच्छता गृह नादुरुस्त झाल्याने तेथील कर्मचारी सध्या कोणतीही दुसरी सुविधा नसल्याने तडजोड करून पुरुषांसाठी असणाऱ्या स्वच्छता गृह वापरण्याचं नियोजन करीत आहेत. तरी सध्याचे चित्र पाहता महिला व पुरुष दोन्हीच्या ही मनात लज्जा उत्पन्न होत असल्याचे दिसून येते. तरी सदर प्रकरणी नादुरुस्त स्वच्छतागृह दुरुस्त होईपर्यंत महिलांसाठी एस. टी. स्टँड शेजारी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्वच्छता गृहाचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी. यासंदर्भातील निवेदन ट्रू नेचर वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.अझहर धनसे,यांनी नगरपंचायत म्हसळा चे नगराध्यक्ष असहल कादरी यांना दिले. यावेळी त्यांचे सहकारी श्री.जहीर धनसे तसेच उपनगराध्यक्ष श्री.शेडगे,नगर सेवक श्री.दिवेकर हे उपस्थित होते. तर सदर निवेदनाला प्रतिसाद देत तातडीने सदर निवेदनावर कार्यवाही करत प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठपुरावा करून महिलांसाठी नियोजन केले जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष साहेबांनी दिले
.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : रशाद करदमे

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  


कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "ट्रू नेचर वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अझहर धनसे यांच्या तर्फे म्हसळा नगर पंचायतीला निवेदन सादर! विलंब न करता कार्यवाही करू नगराध्यक्ष श्री.असहल कादरी यांचे आश्वासन..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...