
जय हनुमान मिठाई दुकानात अस्वच्छतेचा कळस; ग्राहकांचे आरोग्य धोक्यात!
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिठाईसारखे खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवणे, त्यातही प्राण्यांचा संपर्क येणे हे अन्नसुरक्षेच्या नियमांचे सरळसरळ उल्लंघन आहे. यामुळे विविध प्रकारच्या जीवाणूंचा संसर्ग होऊन ग्राहकांना जुलाब, उलट्या आणि इतर गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.
यत्या काही दिवसांत हिंदू समाजाचे अनेक मोठे सण साजरे होणार आहेत. गणपती, दिवाळी आणि इतर सणांमध्ये मिठाईची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. अशा वेळी जर मिठाई दुकानदार अशा अस्वच्छ आणि बेजबाबदार पद्धतीने मिठाईची विक्री करत असतील, तर ते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे.
या घटनेमुळे अन्न व औषध विभाग (FDA) आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न पुरवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते नेमके काय करत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. अशा घटनांवर वेळीच कठोर कारवाई न झाल्यास, इतर मिठाई दुकानदार आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेऊन 'जय हनुमान मिठाई' दुकानावर तात्काळ कडक कारवाई करावी, परवाना रद्द करावा, तसेच सर्व मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आस्थापनांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Response to "जय हनुमान मिठाई दुकानात अस्वच्छतेचा कळस; ग्राहकांचे आरोग्य धोक्यात!"
टिप्पणी पोस्ट करा