मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळ्यात सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीव्र आंदोलनाचा इशारा...

म्हसळ्यात सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीव्र आंदोलनाचा इशारा...


म्हसळा : म्हसळा शहराला महावितरणच्या सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने आणि तो वारंवार येत-जात असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे म्हसळ्याच्या विकासाला खीळ बसत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

म्हसळा शहर हे तालुक्याच्या ८४ गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे अनेक खासगी आणि शासकीय कार्यालये आहेत, जी वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. मात्र, सातत्याने वीज जात असल्यामुळे या कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. तसेच, शिक्षण, बाजारपेठ आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांवरही याचा नकारात्मक परिणाम होत आहे. इतर तालुक्यांतून किंवा शहरातून म्हसळ्यात वास्तव्यास आलेले नागरिकही या समस्येने त्रस्त झाले आहेत. यामुळे म्हसळा शहराची प्रतिमा खराब होत असून विकासाला ब्रेक लागत असल्याचे चित्र आहे.

या गंभीर समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष श्री. अझहर धनसे यांनी केली आहे. त्यांनी महावितरण विभागाला इशारा दिला आहे की, जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. पुढे बोलताना धनसे यांनी असेही म्हटले आहे की, जर हीच अवस्था कायम राहिली, तर शहरातील स्थानिक नागरिक आणि खासगी कार्यालयधारक वीज बिल भरणार नाहीत याची दक्षता महावितरणने घ्यावी.

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, महावितरणने यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे धनसे यांनी स्पष्ट केले आहे.

0 Response to "म्हसळ्यात सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीव्र आंदोलनाचा इशारा..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...