मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रायगड किल्ल्यावर राहणाऱ्या धनगर समाजावर होत असलेल्या अन्याया विरोधात विचारपूस करण्याकरता  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय युवती अध्यक्ष कु.सक्षणा सलगर १५ जून रोजी रायगड किल्ल्यावर.

रायगड किल्ल्यावर राहणाऱ्या धनगर समाजावर होत असलेल्या अन्याया विरोधात विचारपूस करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय युवती अध्यक्ष कु.सक्षणा सलगर १५ जून रोजी रायगड किल्ल्यावर.


विशेष प्रतिनिधी : रायगड किल्ल्यावर असलेले अतिक्रमण काढत असताना  पूर्वपार राहत असलेला धनगर समाजाच्या घरांचे अतिक्रमण हटवण्याचे राज्य शासनाकडून तयारी चालू असून पहिली त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे ठाम मत आहे.  धनगर समाजाचे स्वराज्याच्या लढ्यात असलेली मोलाचे योगदान. रायगड किल्ल्यावरील सर्व पाऊलवाटांची माहिती धनगर समाजाला परिचित आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारा सुद्धा धनगर समाजाचा असुन धनगर समाजाच्या महिलेला हिरकणी हा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर दिला होता. 

सरकारला धनगर समाजाच्या योगदानाचा विसर पडला आहे का? रायगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यास आमचा कोणताही विरोध नसून धनगर समाजाच्या लोकांना बेगर करणे उचित होणार नाही त्यांचं पुनर्वसन करणे गरजेचे आहे. 

किल्ल्यावर राहणाऱ्या धनगर समाजावर अन्याय झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा पर्यायाचे पत्र उपविभाग अधिकारी महाड यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहे.रायगड किल्ल्यावर राहत असलेल्या धनगर समाजावर होत असलेल्या अन्याया संदर्भात विचारपूस करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षणा सलगर या दिनांक १५ जून २०२५ रोजी रायगड किल्ल्यावर येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

0 Response to "रायगड किल्ल्यावर राहणाऱ्या धनगर समाजावर होत असलेल्या अन्याया विरोधात विचारपूस करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय युवती अध्यक्ष कु.सक्षणा सलगर १५ जून रोजी रायगड किल्ल्यावर. "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...