मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा, अजित पवारांना लिहिले पत्र, काय केला आरोप...

शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा, अजित पवारांना लिहिले पत्र, काय केला आरोप...


महाराष्ट्र,पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. त्यासोबत त्यांनी एक पत्र ही लिहिलं आहे. त्यात त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

पुण्यातील शहर राष्ट्रवादीतील धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली आहे. आपली बदनामी झाल्याचा आरोप करत आणि राजकीय कारकीर्द मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. त्यासोबत त्यांनी एक पत्र ही लिहिलं आहे. त्यात त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जमिनीच्या आर्थिक व्यवहारात अपहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सत्यता न पडताळताच हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मानकर यांनी केला होता.

मानकर यांच्या राजीनाम्यात नेमकं काय लिहिले आहे?

काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणार्‍या महानगपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही.

या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे. माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडेविरोधात पुणे पोलिसांनी महिलांच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरणात कुकडेला अटक करण्यात आली. तर त्याच्या बँक खात्याची तपासणी केली असता, मानकर आणि कुकडे यांच्यात 1 कोटींचा व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मानकर यांची चौकशी केली. तर मानकर यांनी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे समोर आल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

0 Response to "शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा, अजित पवारांना लिहिले पत्र, काय केला आरोप... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...