मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शीना बोरा अन् पेणमधील घटनेनंतर पुन्हा महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह, गुलाबी रंगाच्या बॅगेत…

शीना बोरा अन् पेणमधील घटनेनंतर पुन्हा महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह, गुलाबी रंगाच्या बॅगेत…


महाराष्ट्र,पुणे  :
 धावत्या ट्रेनमधून मृतदेह फेकण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या स्टेशनवर कोणकोणत्या गाड्या थांबता त्याचा तपास पोलीस करत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. त्यातून ही बॅग कोण घेऊन आले त्याचा शोध घेतला जाणार आहे.

राज्यात पुन्हा मुंबईतील शीना बोरा हत्येची आठवण झाली आहे. शीना बोरा हत्या, पेणमध्ये सुटकेसमध्ये सापडलेला मृतदेह या घटना अजूनही विस्मृतीत गेल्या नाही. त्याचवेळी रायगड जिल्ह्यात पुन्हा एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला आहे. कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर महिलेचा मृतदेह गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये सापडला आहे. शीना बोरा आणि पेणपाठोपाठ रायगड जिल्ह्यात तिसरी ही थरारक घटना समोर आली आहे.

पनवेल पुणे रेल्वे मार्गावर कर्जत रेल्वे ट्रकवर एका गुलाबी सुटकेसमधून महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबण्यात आला आहे. धावत्या ट्रेनमधून ही बॅग फेकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे हत्येचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ही महिला कोण आहे? तिची हत्या कोणी अन् कशासाठी केली? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतर समोर येणार आहे.

धावत्या ट्रेनमधून मृतदेह फेकण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या स्टेशनवर  कोणकोणत्या गाड्या थांबता त्याचा तपास पोलीस करत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. त्यातून ही बॅग कोण घेऊन आले त्याचा शोध घेतला जाणार आहे.

कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या या मृतदेहामुळे सुटकेस बॉडीजही भयानक संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या आधी शीना बोरा हत्या प्रकरण, पेणमध्ये सुटकेसमधून सापडलेला मृतदेह हे प्रकार घडले होते. आता कर्जतमधील ही घटना आहे. या सलग तीन प्रकरणांनी रायगड जिल्ह्यात नेमके काय सुरू आहे, असा गंभीर सवाल निर्माण होत.

सन २०१२ मधील शीना बोरा हत्या प्रकरण देशभर गाजले होते. शीना बोराची हत्या इंद्राणी मुखर्जी, तिचा चालक श्यामवर आणि संजीव खन्ना यांनी गळा दाबून केली होती. त्यानंतर शीना बोराचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरुन रायगडच्या जंगलांमध्ये फेकला होता. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथे नदी किनारी एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. यावर्षी मार्च महिन्यातच ही घटना घडली होती. दरम्यान, आता लोणावळा रेल्वे पोलिस यंत्रणा महिलेची ओळख पटविण्याचे काम करत आहे.

 

0 Response to "शीना बोरा अन् पेणमधील घटनेनंतर पुन्हा महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह, गुलाबी रंगाच्या बॅगेत…"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...