मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, जेलमध्ये घेतला गळफास...

कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, जेलमध्ये घेतला गळफास...


महाराष्ट्र : 
आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळीने आत्महत्या केल्याचे बोललं जात आहे. विशाल गवळीने गळफास घेत पहाटे आत्महत्या केली.

कल्याण पूर्व भागात 23 डिसेंबरला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करुन तिचा मृतदेह बापगाव परिसरात फेकण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली होती. सध्या तो तळोजा कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. आता आरोपी विशाल गवळीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याने तळोजा कारागृहात गळफास घेत पहाटे आत्महत्या केली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गवळी हा तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज पहाटे त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. विशाल गवळीने पहाटे साडेतीन  वाजता गळफास लावून आत्महत्या केली. विशाल हा पहाटे शौचालयासाठी गेला. त्या ठिकाणी विशाललने टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

तुरुंग प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवले. त्याचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर कारागृह प्रशासनात एकच गोंधळ उडाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह भिवंडी-कल्याण सीमेवरील बापगाव परिसरात फेकून देण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.

कल्याण पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला. त्यांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना अटक केली होती. साक्षीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले होते की, घटनेच्या दिवशी विशालने तिला घरी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. त्यांनी घरातील रक्त पुसून टाकले आणि रात्री साडेआठ वाजता मित्राच्या रिक्षातून बापगावच्या दिशेने जाऊन मृतदेह फेकून दिला.

यानंतर कल्याण क्राईम ब्राँचला विशाल शेगाव या ठिकाण असलेल्या लॉजवर थांबल्याची माहिती मिळाली होती, याच माहितीच्या आधारे पोलीस तिथे पोहोचले. पण विशाल तिकडे नव्हता. त्यानंतर जवळच्या एका सूलनमध्ये दाढी करायला गेलेल्या विशालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशाल हा लूक बदलून पोलिसांना गुंगारा देण्याच्या तयारीत होता.

आता विशाल गवळीने कारागृहात आत्महत्या केल्याने या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस या आत्महत्येच्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.

 

0 Response to "कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, जेलमध्ये घेतला गळफास... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...