चांगल्या वर्तवणूकीमुळे तुरुंगातून सुटला, मोमोजचा धंदा टाकणार होता, मग असे काय केले की…
महाराष्ट्र,कल्याण आंबिवली : पहिल्या गुन्ह्यात नऊ वर्षांची जेल झाली होती. मात्र त्याची तुरुंगातील चांगली वागणूक पाहून त्याला शिक्षा संपण्याआधीच सोडण्यात आले होते. पण..
जेलमध्ये चांगली वर्तणूक केल्याने त्याची केली सुटका झाली
होती. मात्र जेलमधून सुटल्यावर त्याने केली पुन्हा हत्या आणि पुन्हा तुरुंगात
जायची वेळ एका सराईत गुन्हेगारावर आली आहे.या आरोपीला जेलमधून सुटल्यानंतर मोमोजचा
व्यवसाय करायचा होता. परंतू भांडवल नव्हते म्हणून त्याने एक प्लान रचला आणि
कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या ७४ वर्षीय रंजना पाटकर यांची
हत्या झाली होती. त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या गुन्हेगाराला अखेर खडकपाडा
पोलिसांनी अटक केली आहे. चांद उर्फ अकबर शेख (३०) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव
आहे. त्याला यापूर्वीही हत्या प्रकरणात दोषी आढळून कारागृहात सजा भोगली आहे. परंतू
चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी सोडण्यात आले होते.जेलमधून
सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र, मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची गरज होती.
चांदने एका वृद्धेच्या घराची रेकी सुरु
केली होती. वृद्धा घरात एकटीच रहाते हे त्याला कळल्यानंतर त्याने पाणी मागण्याचे
बहाण्याने या ७४ वर्षीय वृद्धेचा घरात प्रवेश मिळविला. त्यानंतर टीव्हीचा आवाज
वाढवित महिलेचा गळा दाबून खून केला. आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील
कर्णफुले मिळून सुमारे १.०५ लाखांचे दागिने पळविले.
खऱ्या आरोपीला पकडले
पोलिसांनी आधी नातेवाईकांच्या माहितीवरुन एका संशयित आरोपीला ताब्यात
घेतले होते. मात्र नंतर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू करत पंधरा दिवसात खरा आरोपीला बेड्या घातल्या आहेत.
पोलिसांनी परिसरात गुन्हेगारांवर पाळत ठेवत 100 पेक्षा अधिक लोकांची माहिती गोळा केली.
पोलिसांच्या गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून खऱ्या आरोपीला पकडले.
आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. हत्या आणि जबरी
चोरीच्या गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकीस आणणाऱ्या खडकपाडा पोलिसांचे कल्याणचे
डीसीपी अतुल झेंडे यांनी कौतुक केले आहे.
0 Response to "चांगल्या वर्तवणूकीमुळे तुरुंगातून सुटला, मोमोजचा धंदा टाकणार होता, मग असे काय केले की…"
टिप्पणी पोस्ट करा