करूणा शर्मा यांना मोठा झटका बसणार? धनंजय मुंडे यांच्या वकिलाचा आजवरचा सर्वात मोठा आरोप काय?
महाराष्ट्र,माझगाव : धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरु आहे. सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात ही सुनावणी सुरु आहे. करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे ठरवत महिन्याला दोन लाख रुपये पोटणी देण्याचा निर्णय वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी कोर्टात आव्हान दिले होते. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी झालेल्या
धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरु आहे. सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात ही
सुनावणी सुरु आहे. करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे ठरवत
महिन्याला दोन लाख रुपये पोटणी देण्याचा निर्णय वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला
होता. या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी कोर्टात आव्हान दिले होते. याप्रकरणी काही
दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी
घ्यायला तयार आहे, पण करुणा शर्मा यांच्याशी
लग्नच झालेले नाही, असा दावा केला होता. आता आज
याप्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली.
सध्या माझगाव कोर्टात करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे वकील
युक्तीवाद करत आहे. करुणा शर्मा ह्यांच्याशी धनंजय मुंडे यांचे लग्नच झाले नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी केला.
करुणा यांना लग्नाचे पुरावे सादर करण्यास सांगितले होते. मात्र वसियतनामा आणि
स्वीकृतीपत्र सोडून बाकी सगळे कागदपत्रे त्यांनी आणले आहेत. त्यांला काही अर्थ
नाही, असे धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत म्हणाल्या.
यानंतर कोर्टाने तुमचा युक्तिवाद संपला
असेल तर ऑर्डर देईन, असे म्हटले. यानंतर करुणा शर्मा यांच्या
वकिलाने युक्तीवाद करण्यास सुरुवात केली. आम्ही सादर करत असलेले पुरावे हेदेखील
महत्वाचे आहेत, असे करुणा मुंडे यांचे वकील म्हणाले.
आम्ही आधीच कागदपत्रे दिलेली आहेत ज्यात करून मुंडे माझ्या पत्नी
नाही हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. वसियतनामा मध्ये जो उल्लेख आहेत, त्यावरून करुणा मुंडे त्यांच्या पत्नी आहेत हे सिध्द होत नाही.
वसियतनामामध्ये जे काही खोट नमूद करण्यात आलेले आहे. त्यासंदर्भात करुणा मुंडे
यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आलेली आहे. त्यांनी डॉक्युमेंट खोटे बनवले
आहेत आणि त्यातल्या गोष्टी आम्ही नाकारत आहोत. करुणा मुंडे फक्त धनंजय मुंडे
यांच्या सोबत काही काळ होत्या. त्या त्यांच्या पत्नी नाहीत, असे धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी म्हटले.
खालच्या कोर्टात ही कागदपत्रे सबमिट
यानंतर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी
मोठा आरोप केला आहे. करुणा शर्मा यांनी कागदपत्रे बनावट बनवली आहेत. त्यावर आम्ही
तक्रार केली आहे. खालच्या कोर्टात ही कागदपत्रे सबमिट केली, तेव्हा आम्हाला कळल, असे धनंजय मुंडेंच्या वकील सायली
सावंतांनी म्हटले.
0 Response to "करूणा शर्मा यांना मोठा झटका बसणार? धनंजय मुंडे यांच्या वकिलाचा आजवरचा सर्वात मोठा आरोप काय?"
टिप्पणी पोस्ट करा