मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण, वकिलाच्या दाव्यानंतर कोर्टाचा मोठा निर्णय!

खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण, वकिलाच्या दाव्यानंतर कोर्टाचा मोठा निर्णय!


महाराष्ट्र,बीड :
 बीड जिल्ह्यातील खोक्या भोसले याला वन विभागाच्या कोठडीत असताना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल आहे.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा अनेक कारणामुळे चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरणं समोर आली आहेत. याच काळात सतीश भोसले उर्फ खोक्याचेही कारणामे समोर आले. त्यानंतर आता हा खोक्या तरुंगात आहे. पोलिसांच्या ताब्यात आहे. असे असतानाच आता या खोक्याला वन विभागाच्या कोठडीत असताना मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे. या मारहाणीचे फोटो व्हायरल जाल्यानंतर आता खोक्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाच्या कोठडीत खोक्या भोसले याला मारहाण झाल्याचा दावा केला जातोय. खोक्याच्या वकिलाने तसा दावा केला आहे. खोक्याला मारहाण झाल्यानंतर वळ उठल्याचे कथित फोटो व्हायरल झाले आहेत. या मारहाणीच्या दाव्यानंतर आता खोक्या भोसलेले पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

खोक्या भोसले याला न्यायालयीन कोठडी

सकाळपासून खोक्या उर्फ सतीश भोसले याला वन विभागाने ताब्यात गेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्याला मारहाण झाल्याचे त्याच्या वकिलाने म्हटले आहे. समोर आलेल्या फोटोंचा आधार घेत वकिलाने सतीश भोसले याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. वकिलाची ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.

खोक्यावर नेमके आरोप काय आहेत?

गेल्या काही दिवसांपूर्वी खोक्या भोसले चांगलाच चर्चेत आला होता. त्याचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. खोक्यावर एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण करणे हा आहे. तर दुसरा गुन्हा हा हरणांची शिकार केल्याचा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देऊन पळत होता. त्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

 

0 Response to "खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण, वकिलाच्या दाव्यानंतर कोर्टाचा मोठा निर्णय!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...