
7 पिस्तुल, 21 काडतूस, हॉटेलमधून पाच जणांना उचललं, मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्लानिंगचा पर्दाफाश...
महाराष्ट्र,मुंबई : गुन्हा घडण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी एक मोठं कारस्थान उधळून लावलं आहे. एका हायप्रोफाईल व्यक्तीच्या हत्येचं आरोपींनी प्लानिंग केल्याची माहिती आहे. थेट हॉटेलवर धाड टाकून मुंबई पोलिसांनी आरोपींना उचललं.
मुंबई पोलिसांनी एक मोठं कारस्थान उधळून लावलं आहे. गुन्हा
घडण्यापूर्वीच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मागच्यावर्षी वांद्रे भागात माजी
आमदार बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या झाली होती. पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबई पोलिसांनी एका
बड्या सेलिब्रिटीच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. अंधेरी पश्चिमेला असेलल्या ‘द प्लॅटिनम’ हॉटेलमधून मुंबई पोलिसांनी
पाच जणांना अटक केली. हे आरोपी बाहेरुन आल्याची माहिती मिळत आहेत. एका हायप्रोफाईल
व्यक्तीच्या हत्येचं त्यांनी प्लानिंग केल्याची माहिती आहे. हे पाचही आरोपी 22 ते 27 वयोगटातील आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 28 मार्च रोजी अंधेरी पश्चिमेला असेलल्या ‘द प्लॅटिनम’ हॉटेलमधून पाच जणांना ताब्यात घेतलं.
हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार येथून हे आरोपी आले होते. एका
बड्या व्यक्तीच्या हत्येच्या प्लानिंगसाठी ते या हॉटेलमध्ये उतरले होते. त्या
व्यक्तीला कसं मारायच? याचं ते प्लानिंग करत होते. पण गुन्हे
शाखेने त्यांचा डाव उधळून लावला.
बिश्नोई गँगच कनेक्शन
पोलिसांनी 28 तारखेला पाच आरोपींना
ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सात पिस्तुल आणि 21 काडतूस जप्त केली आहेत. हे
गुन्हेगार ज्या राज्यातून आले, त्या भागात त्यांच्यावर
गुन्हे दाखल होते. हे पाचही आरोपी बिश्नोई टोळीशी संबंधित असण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. बिश्नोई गँगने आतापर्यंत अभिनेता सलमान खानला
अनेक धमक्या दिल्या आहेत. मागच्यावर्षी बाब सिद्दीकी यांची हत्या घडवून आणली. या
गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात बसून हे सर्व गुन्हे घडवून आणतो.
0 Response to "7 पिस्तुल, 21 काडतूस, हॉटेलमधून पाच जणांना उचललं, मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्लानिंगचा पर्दाफाश... "
टिप्पणी पोस्ट करा