मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अंबरनाथमध्ये चाललंय काय? तोंडाला मास्क लावून आले, तब्बल 16 वेळा तलवारीने सपासप वार… सीसीटीव्ही फुटेज पाहून महाराष्ट्र हादरला...

अंबरनाथमध्ये चाललंय काय? तोंडाला मास्क लावून आले, तब्बल 16 वेळा तलवारीने सपासप वार… सीसीटीव्ही फुटेज पाहून महाराष्ट्र हादरला...


महाराष्ट्र,अंबरनाथ : 
या हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी हातात तलवारी घेऊन हल्ला केला. यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आला आहे.

अंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. शनिवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी हातात तलवारी घेऊन हल्ला केला. यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आला आहे.

अंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचं अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले १० ते १२ हल्लेखोर आले. त्यांनी ऑफिसच्या काचा तलवारीने फोडल्या. यानंतर ते हल्लेखोर ऑफिसमध्ये घुसून तिथे काम करणाऱ्या तरुणावर देखील तलवारीने हल्ला चढवला. तसेच ऑफिसमधील खुर्च्यांचीही तलवारीने वार करत नासधूस केली.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. अवघ्या २३ सेकंदात हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून पसार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

 

0 Response to "अंबरनाथमध्ये चाललंय काय? तोंडाला मास्क लावून आले, तब्बल 16 वेळा तलवारीने सपासप वार… सीसीटीव्ही फुटेज पाहून महाराष्ट्र हादरला... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...