दोन महिन्यांचं बाळ निपचित पडलं, मृत समजून कुटुंब शोकाकुल.. तेवढ्यात झाला ‘असा’ चमत्कार...
महाराष्ट्र,नंदुरबार धडगाव : नंदुरबार धडगाव तालुक्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. माहेरी आलेल्या महिलेचे दोन महिन्यांचे बाल आजारी पडले, उलट्या आणि अति रडण्यामुळे ते निपचित पडलं होतं, काहीच हालचाल करत नव्हतं.
नंदुरबार धडगाव तालुक्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. सध्या त्याचीच
सर्वत्र चर्चा सुरू आहे. माहेरी आलेल्या महिलेचे दोन महिन्यांचे बाल आजारी पडले, उलट्या आणि अति रडण्यामुळे ते निपचित पडलं होतं, काहीच हालचाल करत नव्हतं. अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाचा
मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला. शोकाकुल वातावरणताच त्यांनी
अंत्यसंस्कारांची तयारी केली. मात्र तेवढ्यात डॉक्टरांच्या रुपाने आलेल्या
देवदूताने, त्यांच्या एका कृतीमुळे क्षणात सगळं
वातावरण हसरं झालं. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती मिळाली. त्यांनी
रुग्णवाहिका पाठविली. स्वतःही जात वाटेतच रुग्णवाहिका थांबवून बाळाची तपासणी केली.
आणि त्यांन त्या बाळाच्या पायाला छोटीशी टिचकी मारली. अन् त्या क्षणीच बाळाने
श्वासोच्छ्वास सुरू केला. यामुळे मोठी खळबळ माजली असून सध्या सर्वत्र याच घटनेची
चर्चा सुरू आहे.
नेमकं घडलं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील सूर्यफूल येथे राहणाऱ्या मिनाबाई सचिन पावरा या
होळी निमित्त तेलखेडी येथे आली होती. मात्र तिचं दोन महिन्यांचं बाळ दूध पीत
नव्हतं की काहीच हालचालही करत नव्हतं. त्यामुळे कुटुंबातील लोक खूप घाबरले. बाळ
गेल्याचं समजून त्यांनी आक्रोश सुरू केला. मात्र कुटुंबातील काही व्यक्तांनी ऐन
वेळेस डॉ. गणेश तडवी यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तेथे येऊन बाळाची तपासणी
केली मात्र बाळाची कुठलीही हालचाल होत नव्हती.
तेवढयात डॉक्टरांनी बाळाच्या पायाला टिचकी मारली आणि बाळ
हालचाल करत श्वास घ्यायला लागलं. आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू फुललं. बाळाला
धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सलाईन लावल्यानंतर बाळ नियमित श्वास घ्यायला
लागले. आता बाळाची प्रकृती ठणठणीत असून, दोन दिवसांनी त्याला
डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या रुपाने देवदूतच
आयुष्यात आला आणि बाळाला नवं जीवन देऊन गेला अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत
आहे.
0 Response to "दोन महिन्यांचं बाळ निपचित पडलं, मृत समजून कुटुंब शोकाकुल.. तेवढ्यात झाला ‘असा’ चमत्कार... "
टिप्पणी पोस्ट करा