मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मोठी बातमी! धनंजय मुंडेंवर दबाव वाढला? आता थेट केंद्रीय मंत्र्याकडून राजीनाम्याची मागणी...

मोठी बातमी! धनंजय मुंडेंवर दबाव वाढला? आता थेट केंद्रीय मंत्र्याकडून राजीनाम्याची मागणी...


महाराष्ट्र
करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनंतर आता केंद्रीय मंत्र्यांकडून देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला शंभर टक्के याबाबत माहिती मिळाली आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे.  त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. करुणा शर्मा यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली असताना आता आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील मोठी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले

करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. करुणा शर्मा यांना माहिती मिळाली असेल, मात्र त्याबद्दल माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या केल्याची माहिती सीआयडीला मिळाली आहे, आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मला असं वाटतं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा मोठ्या प्रमाणात जवळचा संबंध होता, पण त्यांचा या हत्येशी काही संबंध नसेल. तसे काही पुरावे देखील नाहीत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्याबाबत अजितदादांनी विचार करणं गरजेचं असल्याचं यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हत्येच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही, पण वाल्मिक कराड हा हत्येतील आरोपी आहे, कराड आणि धनंजय मुंडे यांचा जवळचा संबंध होता, त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, तसा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. त्यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे अमित शाह यांना भेटले हा त्यांचा निर्णय आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, हे संजय राऊत यांनी सांगणं योग्य नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

 

0 Response to "मोठी बातमी! धनंजय मुंडेंवर दबाव वाढला? आता थेट केंद्रीय मंत्र्याकडून राजीनाम्याची मागणी... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...