
जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला. त्याला आम्ही काय करणार- अजित पवार...
महाराष्ट्र : पुण्यात बाबा आढावा यांनी विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. बाबा आढावा यांनी इतका मोठा बदल कसा झाला असा सवाल केला आहे. विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आज अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे तीन दिवसांपासून
पुण्यात आंदोलनाला बसले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात त्यांचं हे आंदोलन आहे.
ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तीन महिन्यात लोकांमधये इतकं
परिवर्तन कसं झालं असा आरोप ही त्यांनी केला आहे. आहे. बाबा आढाव यांच्या या
आंदोलनाला अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांनी
त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे हे देखील त्यांची भेट घेणार आहेत. आज अजित पवार
यांनीही त्यांची भेट घेत त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.
प्रत्येकाला
मत मांडण्याचा अधिकार
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाल की, ‘गेल्या दोन दिवसांपासून बाबा बसले आहेत. काल दिल्लीतून आल्यावर आज
पुण्यात जाऊन बाबांना भेटायचं ठरवलं होतं. त्यानुसार आलोय. ते तीन चार कारणासाठी
आत्मक्लेश करण्यासाठी बसले आहेत. एक गोष्टी खरी आहे. बाबासाहेबांनी संविधान दिलं
आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. हे मत तुम्ही मांडलं. काही गोष्टी
निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. त्यांना स्वायत्ता दिली आहे. काही गोष्टी कोर्टाशी
संबंधित आहे. त्यामुळे त्यांनी काही गोष्टी केल्या आहेत. निर्णय दिले आहेत.’
बारामतीत
लोकसभेला आमचा उमेदवार पडला
‘तुम्ही मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. या वयात रांगेत उभं
राहण्याचा त्रास करून घ्यायचा नव्हता. निवडणूक आयोगाने ज्येष्ठांसाठी घरीच
मतदानाची व्यवस्था केली होती. माझ्या आईनेही मतदान केलं आहे. मतदान केंद्रावर
संध्याकाळी गर्दी होते. त्यामुळे मतदान केंद्रावर संध्याकाळी अंधूक दिसतं.
त्यामुळे लाईटची व्यवस्था झाली. लोकसभेत महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्या. आमच्या
१७ आल्या. आम्ही काही बोललो नाही. आम्ही ईव्हीएम बाबत बोललो नाही. बारामतीत आम्ही
उमेदवार उभा केला होता. ४८ हजाराने पडला. त्यानंतर पाच महिन्याने निवडणूक आल्या. १
लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत सुप्रिया जिंकली. विधानसभेत लोकांनी
अधिक मतदान केलं. जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला. त्याला आम्ही काय करणार.’
ईव्हीएममुळे
पराभव झाल्याचं सिद्ध करुन दाखवा
अजित पवार यांनी यावेळी बोलताना
सांगितले की, विधानसभेत बारामतीची लोकं मला आणि लोकसभेला शरद पवार यांना मतदान करत
होते. पवार साहेबांना ८६ हजाराचं मताधिक्य मिळालं. मला ५० हजाराचं मिळालं. काही
लोकांनी मला मतदान केलं नाही. लोकांचा कौल बदलला. काही पराभूत उमेदवार म्हणतात
ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला. मी म्हटलं तुम्ही सिद्ध करून दाखवा. पटोले म्हणतात
संध्याकाळी मतदान कसं झालं. नाना भाऊ संध्याकाळी मतदान वाढलं. कारण लोक रांगेत
होते. त्यांचं मतदान होईपर्यंत निवडणूक आयोगाने मतदान करून घेतलं. असं ही अजित
पवारांनी म्हटले आहे.
0 Response to "जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला. त्याला आम्ही काय करणार- अजित पवार..."
टिप्पणी पोस्ट करा