मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 महायुतीला लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद; सत्तेत पुन्हा कमबॅक...

महायुतीला लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद; सत्तेत पुन्हा कमबॅक...


महाराष्ट्र :
 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून मतदारांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केलं असून महायुतीला लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद मिळाल्याचं या निकालातून दिसून आलं

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून मतदारांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केलं असून महायुतीला लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद मिळाल्याचं या निकालातून दिसून आलं आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला राज्यातील जनतेने कौल दिला असून महायुतीने राज्यात मॅजिक फिगर ओलांडली हे. महायुतीने 200 पारचा नारा दिला असून राज्यात युतीचा वारू चौखूर उधळला आहे.

महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटापेक्षा महाविकास आघाडीला एकत्र मिळालेल्या जागाही अत्यंत कमी आहेत.

महायुतील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद

जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली.संपूर्ण राज्यात राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना साडे सात हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. मात्र विरोधकांकडून यावरून सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करण्यात आली. तर लाडक्या बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सर्वाधिक फायदा होईल अशी चर्चा सुरू होती. आणि हेच खरे ठरताना दिसत आहे. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा भाजप आणि पर्यायाने महायुतीला झाल्याचं दिसत आहे. लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं चित्र या निवडणुकीत दिसलं.

0 Response to " महायुतीला लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद; सत्तेत पुन्हा कमबॅक... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...