मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शरद पवारांबाबतच्या वादग्रस्त विधानप्रकरणी सदाभाऊ खोतांच्या विरोधात तक्रार दाखल...

शरद पवारांबाबतच्या वादग्रस्त विधानप्रकरणी सदाभाऊ खोतांच्या विरोधात तक्रार दाखल...


महाराष्ट्र,पुणे : 
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. आता सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. वाचा सविस्तर...

माजी मंत्री, महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवारांना त्यांच्या तोंडासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? असं सदाभाऊ खोत यांनी काल जतच्या सभेत म्हटलं आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हे वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांना भोवलं आहे. खोत यांच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शरद पवारांबाबतचं असं विधान खपवून घेणार नाही, असं विलास लांडे म्हणालेत.

विलास लांडे यांनी काय म्हटलं?

सदाभाऊ खोत हे भाजपने पाळलेलं कुत्र आहे. त्यांचे वक्तव्य निंदनीय आहे. शरद पवार हे एक मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य अशोभनीय आहे. खोत यांच्या पाठीमागे बोलावता धनी कोण आहे? भाजप जे पळालेलं एक कुत्र आहे. ते भुंकत असतं. म्हणून ते शरद पवार यांच्यावर बोलत आहेत. त्यांचं वक्तव्य हे निंदनीय आहे. सदभाऊ यांना फिरू देणार नाहीत. आमच्या पक्षाला लुटारू म्हणणारे सदाभाऊ हे स्वत: लुटारू आहेत. त्यांनी अस बोलण हास्यास्पद आहे. सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाई करावी. नेता कुठल्याही पक्षाचा असावा त्यावर बोलताना तारतम्य ठेवून बोलावं, असं विलास लांडे यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांनी सुनावलं

महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांनीही सदाभाऊ खोत यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोत यांचं विधान मला ते अजिबात आवडलेले नाही. राजकारणावर बोलावं. पण शारिरिक व्यंगावर बोलू नये. मला त्या विधानाचं दुःख झालं आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे होऊ नये. ठीके त्यांची चूक झाली, पण त्यांचं असं वक्तव्य नको होतं, असं भुजबळ म्हणालेत.

 

0 Response to "शरद पवारांबाबतच्या वादग्रस्त विधानप्रकरणी सदाभाऊ खोतांच्या विरोधात तक्रार दाखल... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...