
मनोज जरांगे 24 तास राजकारणी, सेटलमेंट बादशाह…कोणी केला थेट आरोप?
महाराष्ट्र : नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, गृहमंत्री होण्यापूर्वी तुझे घर संभाळ. मातोश्रीमध्ये एक शकूनी मामा आहे. संजय राऊत हे त्या ठिकाणी शकुनी मामा आहेत. आता सिल्वर ओकचे शकुनी मामा म्हणजे रोहित पवार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत रंगत वाढत आहे. महाविकास
आघाडी आणि महायुतीत सरळ सामना होत आहे. यावेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे
यांनी प्रत्यक्षात निवडणुकीत उडी घेतली नाही. परंतु मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या
लोकांना पाडा, असे त्यांनी आता जाहीरपणे म्हटले आहे.
मनोज जरांगे यांना राणे पिता-पुत्रांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. आता आमदार
नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे यांचा
मराठा आरक्षण हा विषय आता बाजूला राहिला आहे. ते आता 24 तास राजकारणी झाले आहेत. सेटलमेंट बादशाह झाले आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
लाडकी बहीणमुळे झोप उडाली
लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीतील लोकांची झोप उडाली आहे. आता त्यांनी
आमचीच योजना नाव बदलून आणली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या
विरोधात काँग्रेसचे समर्थक कोर्टात गेले होते. सरकार आले तर या सगळ्या योजना बंद
करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. तुमचा खोटारडेपणा जनतेला समजला
आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होणार
संजय राऊत यांच्यावर नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. राऊत यांनी
महिलांच्या सन्मानाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. खिचडी चोरांना पैशाची किंमत कळणार
नाही. 1500 रुपयांमुळे किती लोकांची दिवाळी गोड झाली ते त्यांना विचारा. परंतु
संजय राऊत हे ‘मुंगेरीलाल के हसीना सपने’ पाहत असतात. आता तर त्यांच्या पक्षाला
विरोधी पक्षनेता पदही मिळणार नाही. विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होणार आहे. त्याचे
नाव 23 तारखेला समजेल. उद्धव ठाकरे म्हणतात, हिंदुत्व कोणाची चूल पेटवत नाही. कारण
ते जिहादी सम्राट झालेले आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या तोंडातून हिंदुत्व हा शब्द
निघेल तेव्हा त्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडावे लागणार आहे.
नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, गृहमंत्री होण्यापूर्वी तुझे घर संभाळ.
मातोश्रीमध्ये एक शकूनी मामा आहे. संजय राऊत हे त्या ठिकाणी शकुनी मामा आहेत. आता
सिल्वर ओकचे शकुनी मामा म्हणजे रोहित पवार आहे.
0 Response to "मनोज जरांगे 24 तास राजकारणी, सेटलमेंट बादशाह…कोणी केला थेट आरोप?"
टिप्पणी पोस्ट करा