मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

‘त्या’ दोन नेत्यांच्या मागणीने भाजप गोत्यात?; उमेदवारी नक्की कुणाला मिळणार?

‘त्या’ दोन नेत्यांच्या मागणीने भाजप गोत्यात?; उमेदवारी नक्की कुणाला मिळणार?


महाराष्ट्र: 
 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच दोन नेत्यांच्या मागणीमुळे भाजप गोत्यात आल्याची चर्चा आहे. कोण आहेत हे दोन नेते? त्यांची मागणी नक्की काय आहे? भाजपत नक्की काय घडतंय? वाचा सविस्तर बातमी...

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. अशातच प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये दोन नेत्यांच्या मागणीमुळे अडचण निर्माण झाली असल्याचं चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणे या दोन नेत्यांच्या भूमिकेमुळे महायुतीला गोत्यात आल्याची चर्चा आहे. एकच घरात दोघांना उमेदवारी मागितली जात असल्याने महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

विखे-पाटलांच्या घरात दोन तिकीटं दिली जाणार?

अहमदनगर जिल्ह्यात विखे-पाटील कुटुंबातील दोघांना उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली जात आहे. अहमदनगरमधील शिर्डी विधानसभा मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार आहेत. सातवेळा ते शिर्डीमधून निवडून आले आहेत. ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय हे लोकसभेला पराभूत झाले. त्यामुळे सुजय विखे हे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. संगमनेर या विधान मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची आहे. माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी सुजय विखे यांनी दर्शवली आहे. पण एकाच घरात दोघांना तिकीट मिळणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

राणेंच्या घरात कुणाला उमेदवारी मिळणार?

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या घरातही दोन तिकीटांची मागणी होत आहे. राणेंची दोन्ही मुलं विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

 

0 Response to "‘त्या’ दोन नेत्यांच्या मागणीने भाजप गोत्यात?; उमेदवारी नक्की कुणाला मिळणार?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...