शिंदे गटाच्या मंत्र्याकडून नवरात्रीनिमित्त साडी वाटप, संतप्त महिलांनी वाटेतच केली साड्यांची होळी...
रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४
Comment
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी या वेगाने घडत आहेत. त्यातच आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र आता या साड्यांची महिलांनी होळी केली आहे. या एक व्हिडीओही समोर आला आहे.
या व्हिडीओत काही महिला या रस्त्यावर साड्यांची होळी करताना
दिसत आहेत. या सर्व महिला सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावातील आहेत. या
साड्यांचे वाटप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. मात्र मराठा समाजातील महिला
आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला
उपस्थित होत्या.
अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची महिला आणि
गावकऱ्यांनी मिळून होळी केली आहे. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक या गावात
त्यांनी ही होळी केली आहे. मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या
साड्यांची होळी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी नवरात्रानिमित्त या साड्यांचे वाटप
केले होते. यानंतर साड्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. यामुळे महिलांनी
साड्यांची होळी केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
0 Response to "शिंदे गटाच्या मंत्र्याकडून नवरात्रीनिमित्त साडी वाटप, संतप्त महिलांनी वाटेतच केली साड्यांची होळी... "
टिप्पणी पोस्ट करा