मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल...

तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल...


महाराष्ट्र: 
गाडीखाली कुत्र जरी आले तरी राजीनामा मागतील. तुम्ही लोकांची तुलना कुत्र्याशी करता. तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहे. अजून पाच वाढवा. जे लाडके असतील त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय? महिला असुरक्षित आहे. राजकारणी असुरक्षित आहे. सामान्य जनतेचं काय? गद्दारांच्या कुटुंबीयांना जी सुरक्षा दिली ती काढून जनतेला का देत नाही”, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले. महाविकासआघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवेळी नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांसह महाविकासआघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला. आम्ही आरोपपत्र जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता न्याय निवाडा करेल याची खात्री आहे. आम्ही राज्याला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

काल दसरा मेळावा झाला. त्यात मी बोललोच आहे. बोलायचं तरी किती हा एक प्रश्न आहे. गद्दारांचा पंचनामा. गद्दारी केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीशी केली असं नाही. महाराष्ट्राशी गद्दारी झाली असं नाही. मोदी शाह यांची गुलाम झाली आहे. अशा पद्धतीने सरकार चाललं आहे. हे सरकार घालवलं पाहिजे. महिन्या दीड महिन्यात घालवलं पाहिजे. काल जी हत्या झाली, बाबा सिद्दीकीची. मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहे. अजून पाच वाढवा. जे लाडके असतील त्यांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय. महिला असुरक्षित आहे. राजकारणी असुरक्षित आहे. सामान्य जनतेचं काय. गद्दारांच्या कुटुंबीयांना जी सुरक्षा दिली ती काढून जनतेला का देत नाही. घरात धुणी भांडी करणाऱ्यांनाही सुरक्षा दिली असेल. राज्यात हत्या होत असतील. अत्याचार होत असतील

शेवटी कोणी काय करायचं हे सरकार आपल्या अंगाला काही लागूदेत नाही. काही महिन्यापूर्वी अभिषेक घोसाळकरची हत्या झाली. ही जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. ते होर्डिंग लावतात, पण कारभाराची जबाबदारी घेत नाही. तेव्हा फडणवीस म्हणाले गाडीखाली कुत्र जरी आले तरी राजीनामा मागतील. तुम्ही लोकांची तुलना कुत्र्याशी करता. तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही.

केवळ जाहिराती सुरू आहे. सिने तारकांना घेऊन जाहिरात करत आहेत. जाहिरात करणारे आणि स्वतचा अनुभव घेऊन तपासणारे लोक एकच आहे. अनेक प्रश्न आहे. आम्ही ते प्रश्न निवडणुकीच्या तपासावेळी मांडूच. आरोपपत्र निष्क्रिय सरकारबद्दल, आम्ही आरोपपत्र जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता न्याय निवाडा करेल याची खात्री आहे. आम्ही राज्याला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, मोदी शहा यांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही.

निर्णयाची उधळपट्टी सुरू आहे. अंमलबजावणी कशी करायची याला काहीच बंधन नाही. जनतेने या सरकारला आता घरी पाठवावं ही अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

0 Response to "तुम्ही राज्य कारभार करण्याच्या लायकीचे नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...