मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी, या महिलांना मिळणार मोठा दिलासा...

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी, या महिलांना मिळणार मोठा दिलासा...


महाराष्ट्र: 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यात यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. मध्य प्रदेशात लाडली बहेना ही योजना प्रचंड यशस्वी झाल्याने त्या राज्यात भाजपाला विधानसभा जिंकता आली. आता महाराष्ट्रात एका महिन्यात विधानसभा निवडणूका लागणार असल्याने त्या मुहूर्तावर ही योजना लागू करण्यात आली आहे.

मतदारांना आकृष्ट करण्यासाठी केंद्र असो वा राज्य सरकार अनेक योजना आणत असते. या योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी लोकांना मिळत असतो. समाजातील विविध घटकांना नजरेसमोर ठेवून या योजना घोषीत केल्या जातात. महिला सबलीकरणासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झालेली आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्या पीए सन्मान निधी योजना आणली तसेच महिलांसाठी विविध राज्यांनी योजना जाहीर केल्या आहे. मध्य प्रदेशातील लाडली बहेना या योजनेने भाजपाला पुन्हा सत्ता मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या योजनेची कॉपी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. 1 जुलैपासून ही योजना महाराष्ट्रात लागू झालेली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये भत्ता मिळत आहे. असे वर्षभरात 18,000 महिलांना मिळणार आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेत पाच हप्ते मिळालेले आहे. आता या योजने संदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महिलांना आणखी संधी देण्यासाठी या योजनेत अर्ज करण्याचा अवधी वाढविण्यात आला आहे.म्हणजे आता या योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

आधी मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजनेसाठी 30 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत 2 कोटी 30 लाख महिलांनी अर्ज केला आहे. अनेक महिलांचे अर्ज रद्द केला आहे. आता महिलांना दुसरी संधी मिळणार आहे.

0 Response to "लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी, या महिलांना मिळणार मोठा दिलासा... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...