
अजितदादांच्या पक्षाला रामराम ठोकून उमेश पाटील अडचणीत, रोहित पवारांचा विरोध, आता शरद पवारांना भेटणार...
महाराष्ट्र,पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचा मुख्य प्रवक्ते पदानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला आहे. महिनाभरापूर्वी उमेश पाटील यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तो स्वीकारला गेला नव्हता. नुकतंच उमेश पाटील यांचं राजीनामा पत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आता उमेश पाटील यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. एकीकडे उमेश पाटील यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरली असली तरी त्यांनी अजित पवारांसोबत असताना खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पक्षाचा महत्त्वाचा चेहरा असलेल्या रोहित पवार यांनी उमेश पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. उमेश पाटील थोड्याच वेळात सिल्वर ओकला शरद पवारांची भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
अजित पवार यांनी जाहीर सभेवेळी केलेल्या वक्तव्याने नाराज झालेले पक्षाचे मुख्य
प्रवक्ते उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये परत येण्याची दाट
शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उमेश पाटील यांनी शरद पवारांची
भेट घेतली होती. तर उमेश पाटील यांनी मंगळवारी शरद पवारांच्या गाडीतून प्रवास
केला. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, त्यांना पक्षात घेण्यास पक्षातील
नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील उमेश पाटील यांना
विरोध दर्शवला आहे.
रोहित पवारांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी उमेश पाटलांच्या पक्षप्रवेशाबद्दलच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले,
"शेवटी प्रवेश कोणाचा घ्यायचा? कधी घ्यायचा? पक्षश्रेष्ठींचा तो विषय आहे. पण, कार्यकर्ता म्हणून मला जर तुम्ही
विचारलं, शरद पवारांबद्दल आणि सुप्रिया
सुळेंबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन उमेश पाटील बोलले आहेत. अशा प्रकारचा
प्रवेश जर होत असेल, तर मी कार्यकर्ता म्हणून आणि
आमच्यात लोकशाही मानसन्मान आहे. पवार साहेब नक्कीच आमच्या भूमिकेवर, नाहीतर आमच्या म्हणण्याला तिथं
तेवढंच वजन देतील",असंही त्यांनी म्हटलं आहे.
"स्पष्ट
बोलणारा मी कार्यकर्ता आहे. उमेश पाटलांचा जर प्रवेश होत असेल, तर आम्ही कार्यकर्ता म्हणून
नाहीतर कार्यकर्त्यांबरोबर हा कार्यकर्ता म्हणून त्याला पाठिंबा देत नाही. त्याचा
विरोध आम्ही पदाधिकारी म्हणून आमच्या नेत्यांसमोर दर्शवू", असंही रोहित पवार यांनी म्हटलं
आहे.
0 Response to "अजितदादांच्या पक्षाला रामराम ठोकून उमेश पाटील अडचणीत, रोहित पवारांचा विरोध, आता शरद पवारांना भेटणार... "
टिप्पणी पोस्ट करा