
अंडवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा...
बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४
Comment
महाराष्ट्र,मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. याशिवाय याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही हायकोर्टाने स्थगिती दिलीय. या शिक्षेला छोटा राजननं आव्हान दिलय. यावर निकाल लागत नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहील असं हायकोर्टाने म्हटलय. मात्र इतर प्रकरणातील अटकेमुळे छोटा राजनचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार. वर्ष 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचं मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं 30 मे रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
0 Response to "अंडवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा... "
टिप्पणी पोस्ट करा