मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

‘आपलं सरकार, लाडकं सरकार’; विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची नवी घोषणा...

‘आपलं सरकार, लाडकं सरकार’; विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची नवी घोषणा...


महाराष्ट्र:  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी पोहरादेवीतील सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी सरकारी योजनांवर भाष्य केलं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची गोळाबेरीज लोकांच्या समोर मांडली आहे. 

विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिममध्ये आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी याठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी सरकारने केलेल्या कामाचा त्यांनी लेखाजोखा मांडला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. महिलांच्या खात्यात तीन टप्प्यातील साडे चार हजार जमा झाले आहेत. कुणी माईचा लाल लाडकी बहिण योजना बंद करू शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं आहे, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

‘बंजारा विरासत’ बद्दल मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

आजच्या या कार्यक्रमासाठी बंजारा समाज एकत्र आला आहे. ‘बंजारा विरासत’चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, असा हा दिवस आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं. यात बंजारा समाजाचा इतिहास आणि परंपरा दाखवण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती, की आदरणीय पंतप्रधानांनी पोहरादेवीला यावं. पण तो इतर कुणाच्या नशिबात योग आला नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नशिबात तो योग होता. मोदीजी इथं आले आणि त्यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण झालं, असं एकनाथ शिंदेंनी पोहरादेवीतील भाषणावेळी म्हटलं.

0 Response to "‘आपलं सरकार, लाडकं सरकार’; विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची नवी घोषणा... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...