मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वांद्र्यातून वरुण सरदेसाईंची उमेदवारी जाहीर होताच झिशान सिद्दीकींचा घणाघात, म्हणाले “यांच्या रक्तात…”

वांद्र्यातून वरुण सरदेसाईंची उमेदवारी जाहीर होताच झिशान सिद्दीकींचा घणाघात, म्हणाले “यांच्या रक्तात…”


महाराष्ट्र:
 महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्र विधानसभेसाठी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे, कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून केदार दिघे, ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांसह अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या यादीत अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आळी आहे. पण या यादीत एका उमेदवाराच्या नावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता यावर काँग्रेसच्या झिशान सिद्दीकींनी प्रतिक्रिया दिली आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघ शिवेसनेचा बालेकिल्ला

उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांना उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्मही दिला आहे. वांद्रे पूर्व हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान याच मतदारसंघात आहे. २०१९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटल्याने काँग्रेसच्या ताब्यात गेला होता. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे विद्यमान आमदार आहेत.

झिशान सिद्दीकी काय म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून झिशान सिद्दीकी हे महायुतीतील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे झिशान सिद्दीकी यांनी ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. जुन्या मित्रांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. एखाद्याची साथ देणं हे यांच्या रक्तातच नाही. त्यामुळे नातं त्याच्यासोबतच ठेवा जो आदर आणि सन्मान देईल. फक्त फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नाही. आता जनता निर्णय घेईल!असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले.

दरम्यान झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या ते महायुतीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांची म्हणजेच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. या दुःखातून सावरत झिशान सिद्दिकी हे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पण मविआकडून त्यांचं तिकीट कापण्यात य़आले आहे. त्यामुळे आता झिशान सिद्दिकी अजित पवार गटातून निवडणूक लढवतात का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

0 Response to "वांद्र्यातून वरुण सरदेसाईंची उमेदवारी जाहीर होताच झिशान सिद्दीकींचा घणाघात, म्हणाले “यांच्या रक्तात…”"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...