मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उद्धव ठाकरे यांच्यासमोर आणखी अडचण, या संघटनेकडून शिवसेनेच्या कोट्यातून जागांची मागणी...

उद्धव ठाकरे यांच्यासमोर आणखी अडचण, या संघटनेकडून शिवसेनेच्या कोट्यातून जागांची मागणी...


महाराष्ट्र,मुंबई:
 नांदेड उत्तरमधून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांना उमेदवारी हवी आहे. त्यासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज ठाकरे, गंगाधर बनबरे व सौरभ खेडेकर मुंबईत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे.

महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन वाद सुरु आहे. अनेक बैठकांमध्ये अजून शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद मिटला नाही. त्यातच शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या सोबतीला असलेल्या संभाजी ब्रिगेडने जागांची मागणी केली आहे. यामुळे पक्षातील दावेदार, काँग्रेस आणि आता संभाजी ब्रिगेड अशी तिहेरी अडचण उद्धव ठाकरे यांच्या समोर निर्माण झाली आहे.

या जागांची केली मागणी

शिवसेना उबाठा आणि संभाजी ब्रिगेड यांची युती आहे. आता या युतीचा वाटा संभाजी ब्रिगेड मागत आहे. संभाजी ब्रिगेडकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच जागांची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड चिखली, हिंगोली व नांदेड उत्तरच्या जागेसाठी आग्रह आहे. चिखलीतून पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी माजी आमदार रेखाताई खेडेकर, हिंगोलीतून संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष अध्यक्ष मनोज आखरे इच्छूक आहेत.

नांदेड उत्तरमधून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांना उमेदवारी हवी आहे. त्यासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज ठाकरे, गंगाधर बनबरे व सौरभ खेडेकर मुंबईत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे. नांदेड उत्तरच्या जागेसाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी ही मुंबईतच बसून आहेत.

उद्धव ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात

शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष इच्छूक उमेदवार माऊली कटके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अजित पवार यांच्या उपस्थितीत माऊली कटके यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिरूर लोकसभेत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. आता माऊली कटके यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

 

0 Response to "उद्धव ठाकरे यांच्यासमोर आणखी अडचण, या संघटनेकडून शिवसेनेच्या कोट्यातून जागांची मागणी... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...