अजित पवार यांचे मुस्लिम कार्ड, शिवसेना- भाजपसोबत असताना विधानसभेचे सूत्र असे ठरवले...
महाराष्ट,मुंबई: विधानसभेत दहा टक्के मुस्लीम समाजातील उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. आपणास शंभर जागा मिळाल्यास त्यातील दहा जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला.
राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप
हिंदुत्वादी पक्ष म्हटले जात आहेत. त्याचवेळी महायुतीमधील पक्ष असलेल्या अजित पवार
यांच्या राष्ट्रवादीने विधानसभेसाठी मुस्लिम कार्ड बाहेर काढले आहे. विधानसभेत दहा
टक्के मुस्लीम समाजातील उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर
केला आहे. आपणास शंभर जागा मिळाल्यास त्यातील दहा जागांवर मुस्लिम समाजातील
उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. हिंदुत्वावादी
महायुतीत असताना अजित पवार यांनी काढलेले मुस्लिम कार्ड भाजप-शिवसेनेसाठी अडचणीचे
ठरण्याची शक्यता आहे.
बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी विधानसभा
निवडणुकीतील राष्ट्रवादीचे धोरण जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा टक्के
मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, बारामतीत शक्ती अभिमान राबवणार आहे. या अभियानातंर्गत शक्ती तक्रार
पेटी ठेवण्यात येणार आहे. तसेच 24 बाय 7 असा मोबाईल नंबर सेवेत ठेवणार आहे.
शक्ती कक्षची उभारणी करण्यात येणार आहे. शक्ती नजर केंद्रामध्ये सोशल मीडियाच्या
माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.
बारामतीत दादागिरी चालणार नाही…
बारामतीमध्ये बाहेरून येणारे लोक
दादागिरी करीत आहेत. बारामतीत ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत
बुधवारी माझी बैठक झाली. मी मागितलेल्या वेळेनुसार ही बैठक झाली. ही बैठक युतीची
नव्हती. बैठकीत मी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले. मी ठरवले आहे की आता कुणावर
टीका करायची नाही.
0 Response to "अजित पवार यांचे मुस्लिम कार्ड, शिवसेना- भाजपसोबत असताना विधानसभेचे सूत्र असे ठरवले... "
टिप्पणी पोस्ट करा