
झापूक झुपूक किंग… ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर सूरज चव्हाणचं बदललं आयुष्य...
महाराष्ट्र: सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने यंदाची 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी जिंकली. 'बिग बॉस मराठी' जिंकल्यानंतर सूरज चव्हाणच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाण्याआधीचा सूरज आणि आताचा सूरज यात फरक आहे. वाचा...
बारामतीच्या मोढवे गावातील सामान्य कुटुंबातील सूरज चव्हाण… आधी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा सूरज चव्हाण आता
महाराष्ट्रभर चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सिझनची ट्रॉफी सूरज चव्हाणने जिंकली. सामान्य
कुटुंबातील मुलगा ते ‘बिग बॉस मराठी’चा विजेता असा सूरजचा प्रवास राहिला आहे. आता ‘बिग बॉस मराठी’ चं विजेतेपद पटकावल्यानंतर
सूरजच्या आयुष्यात बराच बदल झाला आहे. ‘बिग बॉस मराठी’टी ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचं राज्यभरातून कौतुक होतंय.
बारामतीत आणि त्याच्या मोढवे गावात सूरजचं जंगी स्वागतही झालं. सूरजला आता नव्या
सिनेमाची ऑफर देखील आली आहे.
सूरजच्या आयुष्यात मोठा बदल
‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या विजेतेपदावर सूरज
चव्हाणने त्याचं नाव कोरलं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेला तेव्हा या गेमबद्दल सूरजला माहिती नव्हती. पण त्याचा
साधेपणा प्रेक्षकांना भावला. सूरजने ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तर झालाच पण त्याला
एक नवी ऑफर चालून आली. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला सिनेमाची ऑफर
दिली आहे. ‘झापूक झुपूक’ हा सिनेमा केदार शिंदे करत आहेत. या
सिनेमाचा हिरो म्हणून सूरज या सिनेमात दिसणार आहे. पुढच्या वर्षी 2025 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या बाबींमुळे सूरजला प्रेक्षकांचा
पाठिंबा
‘बिग बॉस मराठी’ च्या यंदाच्या सिझनमध्ये अनेक दिग्गज
कलाकार होते. पण या सगळ्यांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला तो सूरज चव्हाण… सूरजचा साधेपणा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. गेम कळत नसतानाही
सूरजचं गेममध्ये टिकून राहणं प्रेक्षकांना आवडलं. सूरजचं सर्वसामान्य कुटुंबातील
आहे. त्याने स्वत: ला बदललं नाही. त्याचा हा साधेपणाच प्रेक्षकांना भावला.
प्रेक्षकांनी सूरजला पाठिंबा दिला. त्याचमुळे सूरज ही ट्रॉफी जिंकू शकला.
सूरज या प्रवासाबद्दल काय म्हणाला?
कलर्स मराठीने सूरज चव्हाणचा एक व्हीडिओ
शेअर केला आहे. यात सूरजने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील त्याचा प्रवास सांगितला आहे. भावांनो, तुमचा झापूक झुपूक किंग… जिंकला की नाही ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी… मी म्हणालो होतो मी जिंकणार आणि मी जिंकलो… तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने मी जिंकलो, असं सूरजने म्हटलं आहे.
0 Response to "झापूक झुपूक किंग… ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर सूरज चव्हाणचं बदललं आयुष्य... "
टिप्पणी पोस्ट करा