
राज ठाकरे म्हणाले, मला फक्त एक खून माफ करा…मग कोणाचा करणार राज ठाकरे खून?
महाराष्ट्र,मुंबई: दरवर्षी फोटो काढतात. हा आजार आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजे. मला त्रास होतो. अनेकांना त्रास होतो. पण त्यामुळे मी महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही. पुढच्यावेळी जास्तीत जास्त भेटेन, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसे नेते राज ठाकरे यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा
घेतला. या मेळाव्यात त्यांनी विविध विषयांवर हात घातला. रतन टाटा
यांच्यासंदर्भातील आठवणी त्यांनी जागवल्या. मोबाईलमुळे होणाऱ्या त्रासाचा विषय राज
ठाकरे यांनी उपस्थित केले. राज म्हणाले, राष्ट्रपतींकडे माझी एक
विनंती आहे. मला एक खून माफ करा. ज्यांना मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना, त्याचा मला खून करायचा आहे. सर्वांना फोटो देणं शक्य होत नाही
हो, एकाने त्याने तोंडाजवळ कॅमेरा आणला. मी म्हटलं नाकातील केस
काढायचे आहे का. कशासाठी फोटो. वर्धापन दिन, वाढदिवस असेल तरी फोटो
काढतात. एखाद्याचा फोटो नसेल तर समजू शकतो. दरवर्षी फोटो काढतात. हा आजार आहे. या
गोष्टी थांबल्या पाहिजे. मला त्रास होतो. अनेकांना त्रास होतो. पण त्यामुळे मी
महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही. पुढच्यावेळी जास्तीत जास्त भेटेन, असे राज ठाकरे म्हणाले.
रतन टाटा यांच्या आठवणी
जगात खूप कमी व्यक्ती आहेत, ज्यांच्या आपण पाया पडावे, असे वाटते. त्यात रतन टाटा होते. मी
त्यांना भेटू शकलो. त्यांच्याशी गप्पा मारु शकलो. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान
समजतो. ते आता निघून गेले. त्यांना मनसेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील.
अनेकांनी पक्षात प्रवेश केला आहे. ही सुरुवात आहे. पुढे बघा काय काय घडते.
स्वागताचे हार बघितले की भीती वाटते. चुकून अजगर गळ्यात गालायचे. किती मोठे हार.
जेसीबीचा हार घालतात. जेसीबीचा हार गाडीवर घातला. गाडी चालवायची कशी. उत्साह प्रेम
समजू शकतो. पण अटोक्यात आणा. मी विदर्भ, मराठवाड्यात फिरलो. असंख्य महाराष्ट्र
सैनिक भेटले. मूळ दौरा चाचपणीचा होता. अनेक ठिकाणी मेळावे लावले, भाषणं ठेवली. आता भाषणं सुरू होतील. त्यावेळी अनेक महाराष्ट्र सैनिक
भेटायला आले. भेटू शकत नाही. अनेकांना फोटो हवे असतात.
आजच्या राजकारणावर टीका
गद्दारी करणारा तुम्हाला का आवडतो.
खासदार आणि आमदार फोडाफोडी करायची, याच्यासी निवडणुका लढवायच्या, दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची हेच चालू आहे. देशाचा विचार करणारा
माणूस हवा की असले धंदे करणारा हवा हे एकदा काय ते ठरवा. राज्यातील जनतेने आज
योग्य निर्णय घेतला नाही तर राज्य बरबाद झाला म्हणून समजा. राज्यात नको त्या
विषयाची घाण पसरेल, असे राज ठाकरे म्हणाले.
0 Response to "राज ठाकरे म्हणाले, मला फक्त एक खून माफ करा…मग कोणाचा करणार राज ठाकरे खून?"
टिप्पणी पोस्ट करा