मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून शाळकरी मुलीवर अत्याचार, वानवडी पोलिसांकडून गाडीचालक अटकेत...

पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून शाळकरी मुलीवर अत्याचार, वानवडी पोलिसांकडून गाडीचालक अटकेत...

पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत मुलगी एका शाळेत शिकत आहे. चार दिवसांपूर्वी मुलगी शाळेतून घरी आली. तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली. वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली. तेव्हा विद्यार्थी वाहतूक करणारे संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात, अशी माहिती तिने वडिलांना दिली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलीला दुचाकीवरुन शाळेत सोडले. मुलीच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन पालकांना याबाबतची माहिती दिली. पालकांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा आरोपी संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. त्यानंतर वानवडी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक आयुक्त गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी व्हॅन चालक रेड्डीला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक देवधर तपास करत आहेत.

0 Response to "पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून शाळकरी मुलीवर अत्याचार, वानवडी पोलिसांकडून गाडीचालक अटकेत... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...